कराची - आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदवर खुप टीका झाली. त्याला कर्णधारपदावरुन काढण्यात यावे असाही चाहत्यांमध्ये सूर उमटला होता. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याच्याविषयी एक चांगला निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - शिखरने सांगितले विराटचे ड्रेसिंगरुममधील गुपित...पाहा व्हिडिओ
सरफराजला पाकिस्तान क्रिकेटच्या कर्णधारपदी कायम ठेवण्यात आले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी सरफराज पाकिस्तानचा कर्णधार असणार आहे. तर, बाबर आझमला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. 'मला खुप सन्मानित झाल्यासारखे वाटत आहे. मला कर्णधारपद भूषवणे आवडते. मी संघासाठी नेहमी चांगले योगदान देण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी मी माजी कर्णधार मिसबाहची मदत घेईन', असे सरफराजने म्हटले आहे.
-
🚨 BREAKING NEWS 🚨 @SarfarazA_54 retained Pakistan captain; @babarazam258 appointed vice-captain
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
More ▶️ https://t.co/rY6H4kOdDl pic.twitter.com/rkwGCips8p
">🚨 BREAKING NEWS 🚨 @SarfarazA_54 retained Pakistan captain; @babarazam258 appointed vice-captain
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 13, 2019
More ▶️ https://t.co/rY6H4kOdDl pic.twitter.com/rkwGCips8p🚨 BREAKING NEWS 🚨 @SarfarazA_54 retained Pakistan captain; @babarazam258 appointed vice-captain
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 13, 2019
More ▶️ https://t.co/rY6H4kOdDl pic.twitter.com/rkwGCips8p
सरफराज पुढे म्हणाला, 'मला माहित आहे की, आम्ही एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन केलेले नाही. आम्ही आमच्या चाहत्यांनाही निराश केले आहे. मात्र, आम्हाला आशा आहे की ही नुकसानभरपाई आम्ही लवकर करू.' श्रीलंकेविरुद्ध बाबर आझमला तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांसाठी उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला. या सामन्यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानच्या खेळाडूंना ट्रोल करण्यात आले. काही पाकिस्तानी चाहत्यांनी तर खेळाडूंना शिवीगाळ केल्याचेही समोर आले होते. यामध्ये प्रामुख्याने कर्णधार सर्फराज अहमद, शोएब मलिक यांच्यावर चाहत्यांचा रोष होता. रावळपिंडी एक्स्प्रेस समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यानेही आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीत पाकिस्तानच्या संघावर ताशेरे ओढले होते. त्याने सरफराजला 'बिनडोक' कर्णधार म्हटले होते.