ETV Bharat / sports

नवे वर्ष, नवा संकल्प...सचिनने शेअर केलेला प्रेरणादायी व्हिडिओ पाहिलात का?

क्रिकेट खेळत असलेल्या मड्डा राम नावाच्या एका अपंग मुलाचा व्हिडिओ सचिनने शेअर केला आहे. '२०२० साठी या मुलापासून मी प्रेरणा घेणार असून तुम्हीही प्रवासाला प्रारंभ करा', असे सचिनने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

sachin tendulkar share inspirational video of a kid for 2020
नवे वर्ष, नवा संकल्प...२०२० साठी सचिनने शेअर केलेला 'तो' प्रेरणादायी व्हिडिओ पाहिलात का?
author img

By

Published : Jan 1, 2020, 1:19 PM IST

Updated : Jan 1, 2020, 1:27 PM IST

मुंबई - २०१९ वर्षाला निरोप देऊन २०२० या नवीन वर्षात सर्वांचे आगमन झाले आहे. अनेकांनी या नवीन वर्षासाठी विविध संकल्प केले असणार आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरनेही एक प्रेरणादायी व्हिडिओ शेअर करत या वर्षाचे स्वागत केले आहे.

  • Start your 2020 with the inspirational video of this kid Madda Ram playing cricket 🏏 with his friends.
    It warmed my heart and I am sure it will warm yours too. pic.twitter.com/Wgwh1kLegS

    — Sachin Tendulkar (@sachin_rt) January 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - भारताविरुद्धच्या मालिकेसाठी लंकेचा संघ जाहीर, १८ महिन्यानंतर 'हा' खेळाडू संघात परतला

क्रिकेट खेळत असलेल्या मड्डा राम नावाच्या एका अपंग मुलाचा व्हिडिओ सचिनने शेअर केला आहे. '२०२० साठी या मुलापासून मी प्रेरणा घेणार असून तुम्हीही प्रवासाला प्रारंभ करा', असे सचिनने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. क्रिकेटजगतात अनेक युवा खेळाडूंसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर प्रेरणास्त्रोत म्हणून ओळखला जातो. क्रिकेटसाठी त्याने दिलेले योगदान अवर्णनीय आहे. सचिनने क्रिकेटला अलविदा केला असला तरी त्याचे अनेक विक्रम आजही सर्वांच्या स्मरणात आहेत.

क्रिकेटच्या सर्व प्रकारांत मिळून सचिनच्या खात्यात ३४,३५७ धावा जमा आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८,४२६ तर, कसोटीत त्याने १५,९२१ धावा चोपल्या आहेत. सध्या सचिन आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचा मार्गदर्शक म्हणून काम पाहत आहे.

Intro:Body:

नवे वर्ष, नवा संकल्प.. २०२० साठी सचिनने शेअर केलेला 'तो' प्रेरणादायी व्हिडिओ पाहिलात का?

मुंबई - २०१९ वर्षाला निरोप देऊन २०२० या नवीन वर्षात सर्वांचे आगमन झाले आहे. अनेकांनी या नवीन वर्षासाठी विविध संकल्प केले असणार आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरनेही एक प्रेरणादायी व्हिडिओ शेअर करत या वर्षाचे स्वागत केले आहे.

हेही वाचा -

क्रिकेट खेळत असलेल्या मड्डा राम नावाच्या एका अपंग मुलाचा व्हिडिओ सचिनने शेअर केला आहे. '२०२० साठी या मुलापासून मी प्रेरणा घेणार असून तुम्हीही प्रवासाला प्रारंभ करा', असे सचिनने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. क्रिकेटजगतात अनेक युवा खेळाडूंसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर प्रेरणास्त्रोत म्हणून ओळखला जातो. क्रिकेटसाठी त्याने दिलेले योगदान अवर्णनीय आहे. सचिनने क्रिकेटला अलविदा केला असला तरी त्याचे अनेक विक्रम आजही सर्वांच्या स्मरणात आहेत.

क्रिकेटच्या सर्व प्रकारांत मिळून सचिनच्या खात्यात ३४,३५७ धावा जमा आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८,४२६ तर, कसोटीत त्याने १५,९२१ धावा चोपल्या आहेत. सध्या सचिन आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचा मार्गदर्शक म्हणून काम पाहत आहे.

Conclusion:
Last Updated : Jan 1, 2020, 1:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.