ETV Bharat / sports

सचिनने आजच्या दिवशीच झळकावले होते 'शंभरावे' शतक

बांगलादेशविरूद्ध सचिनने १४७ चेंडूत ११४ धावांची खेळी केली होती

सचिन तेंडुलकर
author img

By

Published : Mar 16, 2019, 11:47 PM IST

मुंबई - क्रिकेटविश्वाचा देव, अशी ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरने आजच्या दिवशीच १६ मार्च २०१२ रोजी ऐतिहासिक शतकी खेळी करत नवा विश्वविक्रम रचला होता. मिरपूर शेर-ए-बांगला नॅशनल मैदानावर बांगलादेशविरूद्ध ११४ धावांची खेळी करत सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १०० वे शतक ठोकले होते. सचिनचे हे एकदिवसीय क्रिकेटमधील ४९ वे शतक होते.

बांगलादेशविरूद्धच्या या सामन्यात सचिनने १४७ चेंडूत ११४ धावांची खेळी केली होती. सचिनच्या आधी आणि नंतरही आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुणालाही १०० शतके करता आलेली नाहीत.

सचिनच्या नावावर एकूण आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८४२६, तर कसोटी क्रिकेटमध्ये १५९२१ धावा जमा आहेत आहेत. सचिनने कसोटीत ५१, तर वनडेमध्ये ४९ शतके झळकावली आहेत.

१५ नोव्हेंबर १९८९ ला क्रिकेट विश्वात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने कराची येथे पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले होते. अनेक वर्ष क्रिकेटविश्व गाजवल्यानंतर सचिन १६ नोव्हेंबर २०१३ ला निवृत्त झाला होता. विंडीजविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात सचिनने ७४ धावांची खेळी केली होती.

Intro:Body:

Sachin Tendulkar scores his 100th international century for India

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.