ETV Bharat / sports

'जय महाराष्ट्र..!' सचिन तेंडुलकरने दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

author img

By

Published : May 1, 2020, 11:42 AM IST

Updated : May 1, 2020, 12:25 PM IST

कोरोनाच्या प्रकोपामुळे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा ६० वा वर्धापण दिन आज साधेपणाने साजरा केला जात आहे. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांची निर्मिती झाली. याप्रसंगी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने साऱ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Sachin Tendulkar Posts Maharashtra Day 2020 Wish in Marathi
'जय महाराष्ट्र..!' सचिन तेंडुलकरने दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

मुंबई - कोरोनाच्या प्रकोपामुळे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा ६० वा वर्धापन दिन आज साधेपणाने साजरा केला जात आहे. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांची निर्मिती झाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर १ मे रोजी महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये स्थापन करण्यात आली. याला आज ६० वर्षे पूर्ण होत आहेत. यंदाचे हे हीरक महोत्सवी वर्ष आहे. याप्रसंगी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने साऱ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिनने ट्विटच्या माध्यमातून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने महाराष्ट्राची ओळख असलेला मराठमोळ्या पद्धतीचा फेटा बांधलेला स्वत:चाच फोटो शेअर केला आहे. त्या फोटोसोबत त्याने, आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! जय महाराष्ट्र, असे संदेशही लिहिला आहे. तसेच त्याने त्या ट्विटमध्ये #MaharashtraDay हा हॅशटॅगदेखील वापरला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. १ मे हा दिवस जगभरात कामगार दिन म्हणूनही पाळला जातो.

  • आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! जय महाराष्ट्र! #MaharashtraDay pic.twitter.com/gSNTBgL3wl

    — Sachin Tendulkar (@sachin_rt) May 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात १०५ हुतात्म्यांचे बलिदान गेलं. यामुळे हा दिवस महाराष्ट्रातील जनतेसाठी जिव्हाळय़ाचा व भावनिकदृष्टय़ा महत्वाचा आहे. १ मे १९६० रोजी महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर दरवर्षी राज्यभरात महाराष्ट्र दिन अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. पण कोरोनाचा प्रकोपामुळे यंदा हा दिवस साधेपणाने साजरा केला जात आहे. राज्याने १० हजार कोरोनाग्रस्तांचा आकडा पार केला आहे.

हेही वाचा - 'सुपर कूल' केन विल्यमसन ठरला न्यूझीलंडचा सर्वोत्कृष्ट खेळाडू

हेही वाचा - शमी, बुमराह क्रूर गोलंदाज, ते नेट सरावात फलंदाजाचे डोकं फोडण्यासाठी प्रयत्न करतात - रोहित शर्मा

Last Updated : May 1, 2020, 12:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.