ETV Bharat / sports

IND Women VS SA Women ३rd ODI : दक्षिण आफ्रिकेचा भारतावर विजय - महिला क्रिकेट न्यूज

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने भारताचा डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे सहा धावांनी पराभव केला. या विजयासह आफ्रिका संघाने पाच सामन्याच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे.

SA W beat IND W 3rd ODI: South Africa women win by 6 runs via D/L method, lead series 2-1
IND Women VS SA Women ३rd ODI : दक्षिण आफ्रिकेचा भारतावर विजय
author img

By

Published : Mar 13, 2021, 12:10 PM IST

लखनऊ - तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने भारताचा डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे सहा धावांनी पराभव केला. या विजयासह आफ्रिका संघाने पाच सामन्याच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे.

भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ५ बाद २४८ धावा केल्या. पूनमने भारताकडून सर्वाधिक ७७ धावांची खेळी केली. तर कर्णधार मिताली राज, हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी ३६ धावांचे योगदान दिले

भारताने विजयासाठी दिलेले २४९ धावांचे आव्हान पार करताना आफ्रिकेच्या लिझेली हिने नाबाद १३२ धावांची खेळी केली. यात १६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. ४६.३ षटकांत ४ बाद २२३ अशी पाहुण्यांची स्थिती असताना पावसाने हजेरी लावली. तेव्हा अखेर डकवर्थ-लुईस नियमांच्या आधारे आफ्रिकेला विजयी घोषित करण्यात आले. उभय संघातील चौथा सामना १४ मार्चला होणार आहे.

हेही वाचा - 'मोठ्या' विक्रमामुळे मिताली राज ठरतेय चर्चेचा विषय!

हेही वाचा - IND vs ENG: पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा दारुण पराभव; इंग्लंडची आघाडी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.