रायपूर - रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज २०२१ चा आज अंतिम सामना, इंडिया लिजेड्स आणि श्रीलंका लिजेड्स यांच्यात होणार आहे. इंडिया लिजेड्सने उपांत्य फेरीत वेस्ट इंडिज लिजेड्सचा १२ धावांनी पराभूत करत अंतिम सामन्यात धडक मारली होती. तर श्रीलंका लिजेड्सने दक्षिण आफ्रिका लिजेड्सवर ८ विकेट्सने मात करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.
उभय संघातील अंतिम सामना रायपूरच्या शहिद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरूवात होईल.
इंडिया लिजेड्सचा संघ -
विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर (कर्णधार), मोहम्मद कैफ, युवराज सिंह, युसुफ पठाण, नमन ओझा (यष्टीरक्षक), इरफान पठाण, मनप्रीत गोनी, विनय कुमार, प्रज्ञान ओझा, मुनाफ पटेल, एस बद्रीनाथ, नोएल डेव्हिड, साईराज बहुतुले आणि समीर दिघे.
श्रीलंका लिजेड्सचा संघ -
तिलकरत्ने दिलशान (कर्णधार), सनथ जयसूर्या, उपुल थरंगा (यष्टीरक्षक), चिंताक जयसिंगे, चमार सिल्वा, कौशल्या वेरातने, रुसेल अर्नोल्ड, फरवीज महारूफ, नुवान कुलशेकर, धम्मिका प्रसाद, रंगना हेरथ, रोमना कलावा, रोमना कलावा चामारा कापुगेदेरा आणि मालिंदा वारणापुरा.
हेही वाचा - Ind vs Eng ५th T२० : भारताने अंतिम सामन्यासह मालिका ३-२ ने जिंकली
हेही वाचा - महिला क्रिकेट : दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या टी-२० सामन्यात भारतावर ८ गडी राखून विजय