सिडनी - माजी कर्णधार रिकी पाँटिंगला इंग्लंडमध्ये मे-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या विश्वकरंडकासाठी ऑस्ट्रेलिया संघाचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. संघाची फलंदाजी मजबूत करण्याची जबाबदारी त्याच्यावर देण्यात आली आहे. ५ विश्वचषक खेळून ३ विश्वचषक जिंकून देणाऱ्या पाँटिंगची नियुक्ती गोलंदाजी प्रशिक्षक डेविड साकेर यांच्या जागेवर झाली आहे. साकेर यांनी नुकताच राजीनामा दिला होता.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीए याबाबत बोलताना म्हणाले, की रिकी फलंदाजीवर लक्ष केंद्रित करेल तर सध्याचे ग्रीम हिक अॅशेजच्या तयारीत व्यस्त आहेत. मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर म्हणाला की, रिकी केवळ फलंदाजांचा मार्गदर्शक नसून संपूर्ण संघाचा मार्गदर्शक आहे. आम्ही सर्वजण विश्वचषक जिंकण्यासाठी प्रयत्न करु. यावेळी संघाने काय करायला पाहिजे हे रिकीला चांगले माहित आहे.
पाँटिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने २००३ आणि २००७ मध्ये २ वेळा विश्वचषक जिंकला आहे. त्याने ३७५ एकदिवसीय आणि १६८ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. भारत आणि पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या मालिकेनंतर तो ही जबाबदारी सांभाळेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.