बंगळुरू - आयपीएलमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. हा सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे.
या सत्रात कोहलीच्या बंगळुरूचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले आहे. तर राजस्थानला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी उरलेल्या सर्व सामन्यांमध्ये विजय अनिवार्य असून, जर तरच्या समीकरणांवर अवलंबून राहावे लागेल.
बंगळुरूची मुख्य मदार ही कोहली आणि डिव्हिलियर्सवर असेल तर राजस्थानला विजयासाठी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, अजिंक्य रहाणे आणि संजू सॅमसन याच्यांवर अवलंबून राहावे लागणार आहे. गुणतालिकेचा विचार केला असता राजस्थान १० गुणांसह सातव्या तर बंगळुरू ८ गुणांसह आठव्या स्थानी आहे.