सिडनी - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाला दुखापत झाली. तपासणीअंती त्यांची दुखापत गंभीर असल्याचे दिसून आले. यामुळे तो दुसऱ्या डावात गोलंदाजी देखील करू शकला नाही. पण आता गरज पडल्यास जडेजा फलंदाजी करेल, अशी माहिती मिळाली आहे.
उभय संघात चार सामन्याची मालिका खेळवण्यात येत आहे. यातील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकला. तिसरा सामना सिडनीमध्ये खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी ४०७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. रोहित-शुबमनच्या आश्वासक सलामीनंतर हा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. अशात जर भारतीय संघाला गरज भासल्यास रविंद्र जडेजा, जो की दुखापतग्रस्त आहे, तो वेदना कमी करणारे इंजेक्शन घेऊन मैदानात फलंदाजीसाठी येऊ शकतो.
बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, 'भारतीय संघाला कसोटी सामना वाचविण्याची गरज भासल्यास जडेजा इंजेक्शन घेऊन फलंदाजी करेल.'
जडेजाला अशी झाली दुखापत
सिडनी कसोटीत मिशेल स्टार्कचा एक चेंडू जाडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर लागला. यात त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले. यात त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा - रविंद्र जडेजाची दुखापत गंभीर, इंग्लंडविरुद्धच्या २ कसोटी सामन्यांना मुकणार
हेही वाचा - पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणे ऑस्ट्रेलियन कर्णधाराला भोवले