नवी दिल्ली - यूएईत पार पडलेल्या आयपीएलच्या तेराव्या पर्वानंतर आता चौदाव्या पर्वाची तयारी सुरू झाली आहे. आयपीएलमधील सहभागी फ्रेंचायझींनी आज बुधवारी त्यांच्या संघात कायम ठेवलेल्या आणि संघातून रिलिज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. काहींनी मोठे धक्के देत आपल्या महत्त्वाच्या खेळाडूंना मुक्त केले आहे. त्यात स्मिथचेही नाव समोर आले आहे.
हेही वाचा - मोठी बातमी... मुंबई इंडियन्सने संघातून वगळला 'यॉर्करकिंग' गोलंदाज!
राजस्थान रॉयल्सने त्यांचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला संघातून मुक्त केले आहे. ''कायमस्वरुपी रॉयल. स्मिथ तुझ्या आठवणी कायमस्वरुपी बरोबर असतील. धन्यवाद'', असे राजस्थान रॉयल्सने आपल्या ट्विटमध्ये म्हटले. स्टीव्ह स्मिथला क्रिकेट सामन्यांचा खूप अनुभव होता, पण राजस्थान रॉयल्ससाठी तो उपयोगात आला नाही. स्मिथला रिलिज केल्यानंतर राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनकडे कर्णधारपद सोपवले आहे. माजी भारतीय खेळाडू आकाश चोप्रा म्हणाला होता की, राजस्थान रॉयल्सने नव्या कर्णधाराबसोबत खेळले पाहिजे.
आयपीएलच्या मागील हंगामात राजस्थानचा संघ गुणतालिकेत तळाशी होता. यामुळेच फ्रेंचाइजीला स्मिथच्या निर्णयाबद्दल विचार करण्यास भाग पाडले गेले.