ETV Bharat / sports

IPL : राजस्थानचा मुंबईवर ५ गडी राखून विजय, कर्णधार स्मिथ ठरला विजयाचा शिल्पकार

स्मिथची शानदार ५९ धावांची अर्धशतकी खेळी

author img

By

Published : Apr 20, 2019, 6:16 PM IST

Updated : Apr 20, 2019, 8:54 PM IST

स्टीव्ह स्मिथ

जयपूर - सवाई मानसिंह स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या ३६ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर ५ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात मुंबईच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत २० षटकांमध्ये ५ गडी गमावत १६१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान संघाने १९.१ षटकामध्ये ५ गडी गमावत विजय साजरा केला.

आजच्या सामन्याच अजिंक्य रहाणेच्या जागी राजस्थानच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणाऱ्या स्टीव्ह स्मिथने नाबाद ५९ धावांची अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. तर रियान परागने ४३ आणि संजू सॅमसनने ३५ धावा करत कर्णधाराला चांगली साध दिली. मुंबईकडून राहुल चहरने सर्वाधिक ३ विकेट घेतलेत.

राजस्थानविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना मुंबईची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा सुरुवातीलाच अवघ्या ५ धावांवर माघरी परतला. यानंतर सलामीवीर क्विंटन डी कॉकने शानदार खेळी करत ४६ चेंडूत ६५ धावांची अर्धशतकी खेळी केली. सूर्यकुमार यादवने ३४ तर हार्दिक पांड्या २३ धावांची खेळी करच मुंबईचा डाव दिडशेपार नेला. राजस्थानकडून श्रेयस गोपालने २ तर स्टुअर्ट बिन्नी, जोफ्रा आर्चर आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी १ बळी घेतले.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Apr 20, 2019, 8:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.