ETV Bharat / sports

सुपर गुरू! राहुल द्रविड एक नाही तर तब्बल १६ देशांचा प्रशिक्षक

बीसीसीआयच्या वतीने भारतात इतर १६ देशांच्या युवा खेळाडूंना क्रिकेटचे धडे देण्यात येणार आहेत. भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने भारतीय अंडर-१९ संघाला आणि भारतीय अ संघाला प्रशिक्षण दिले आहे. यामुळे 'सुपर गुरू' म्हणून राहुल द्रविडची निवड करण्यात आली आहे. लंडनमध्ये भारत सरकाराने कॉमवेल्थ बैठकीत हा निर्णय घेतला आहे.

सुपर गुरू..! राहुल द्रविड एक नाही तर तब्बल १६ देशांचा प्रशिक्षक
author img

By

Published : Oct 18, 2019, 11:40 AM IST

नवी दिल्ली - रवी शास्त्री टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी पार पाडत असताना भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड चक्क १६ देशांच्या खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहे. याबाबतीत रवी शास्त्री टीम इंडियाचे 'गुरू' ठरले असताना तर, द्रविड 'सुपर गुरू' ठरला आहे.

बीसीसीआयच्या वतीने भारतात इतर १६ देशांच्या युवा खेळाडूंना क्रिकेटचे धडे देण्यात येणार आहेत. भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने भारतीय अंडर-१९ संघाला आणि भारतीय अ संघाला प्रशिक्षण दिले आहे. यामुळे 'सुपर गुरू' म्हणून राहुल द्रविडची निवड करण्यात आली आहे. लंडनमध्ये भारत सरकाराने कॉमवेल्थ बैठकीत हा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये १६ देशांच्या मुला-मुलींना भारतात क्रिकेट ट्रेनिंगसाठी आमंत्रित केले होते. बंगळुरू येथे पुढच्या वर्षी १ ते ३० ऑक्टोबर दरम्यान हे प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे, या मुला-मुलींच्या राहण्याची तसेच, ट्रेनिंग कँपची सुविधा भारत सरकार करणार आहे.

दरम्यान, बीसीसीआयने नरेंद्र मोदी, विदेश मंत्रालय आणि क्रिडा मंत्रालयाशी चर्चा करून १६ देशांतील १८ मुले आणि १७ मुलींची निवड केली आहे. या १६ देशांमध्ये बोस्तवाना, कॅमरून, केनिया, मोजांबिक्यू, मॉरिशस, नामिबिया, नायझेरिया, रावांडा, युगांडा, जांबिया, मलेशिया, जमैका, त्रिनिदाद आणि टोबागो, फुजी आणि तन्जानिया अशा देशांचा समावेश आहे.

हेही वाचा - भारताविरुध्दच्या टी-२० मालिकेसाठी बांगलादेश संघाची घोषणा, 'या' अनुभवी खेळाडूकडे नेतृत्व

हेही वाचा - विराटने ठेवला अनुष्कासाठी करवा चौथचा उपवास, पाहा क्रिकेटर्सचा करवा चौथ

Intro:Body:

news sports

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.