नवी दिल्ली - भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम सर केले. भारताचा भरवशाचा फलंदाज म्हणून बिरूद मिरवणाऱ्या द्रविडला खेळपट्टीवर ठाण मांडून बसण्याच्या कलेमुळे 'द वॉल' नावाने ओळखले जाऊ लागले. आता त्याचा मुलगा समितही सोशल मीडियावर 'ज्युनियर वॉल' नावाने चर्चेत आला आहे.
हेही वाचा - 'तुला माझा सामना करावाच लागेल!'..बुमराहची नवीन खेळाडूला तंबी
समितने कर्नाटक राज्य १४ वर्षांखालील स्पर्धेतील एका सामन्यात चमकदार कामगिरी केली. त्याने या सामन्याच्या पहिल्या डावात द्विशतक आणि दुसऱ्या डावात नाबाद ९४ धावा ठोकल्या. फलंदाजीशिवाय गोलंदाजीतही समितने आपले योगदान दिले. त्याने या सामन्यात ३ बळी टिपले.
-
समित द्रविडने (राहुल द्रविडचा मुलगा) कर्नाटक राज्य १४ वर्षाखालील स्पर्धेतील एकाच सामन्याच्या पहिल्या डावात केले द्विशतक (२०१) तर दुसऱ्या डावात केल्या नाबाद ९४ धावा. तसेच सामन्यात ३ बळी देखील टिपले.#घट्टपायाउत्तमभिंत 😊#SamitDravid #क्रिकेटजगत pic.twitter.com/lD9blJ5BCa
— क्रीडाजगत (@kridajagat) December 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">समित द्रविडने (राहुल द्रविडचा मुलगा) कर्नाटक राज्य १४ वर्षाखालील स्पर्धेतील एकाच सामन्याच्या पहिल्या डावात केले द्विशतक (२०१) तर दुसऱ्या डावात केल्या नाबाद ९४ धावा. तसेच सामन्यात ३ बळी देखील टिपले.#घट्टपायाउत्तमभिंत 😊#SamitDravid #क्रिकेटजगत pic.twitter.com/lD9blJ5BCa
— क्रीडाजगत (@kridajagat) December 20, 2019समित द्रविडने (राहुल द्रविडचा मुलगा) कर्नाटक राज्य १४ वर्षाखालील स्पर्धेतील एकाच सामन्याच्या पहिल्या डावात केले द्विशतक (२०१) तर दुसऱ्या डावात केल्या नाबाद ९४ धावा. तसेच सामन्यात ३ बळी देखील टिपले.#घट्टपायाउत्तमभिंत 😊#SamitDravid #क्रिकेटजगत pic.twitter.com/lD9blJ5BCa
— क्रीडाजगत (@kridajagat) December 20, 2019
भारतीय क्रिकेटला अनमोल योगदान देणाऱ्या द्रविडने निवृत्तीनंतर युवा खेळाडूंमधील कौशल्य आणि क्षमता ओळखण्यास सुरुवात केली. त्यामुळे रिषभ पंत, हनुमा विहारी, पृथ्वी शॉ, विजय शंकर यांसारख्या खेळांडूना भारतीय संघात स्थान पक्के करण्यास मदत झाली. आता समितचे नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी येणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.