लखनऊ - सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी फलंदाज प्रियम गर्ग याची उत्तर प्रदेश संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक शर्मा यांनी ही माहिती दिली.
हेही वाचा - भारताच्या 'जलदगती'समोर कांगारूंची भंबेरी; पहिल्या डावात ८६ धावांची आघाडी
लेगस्पिनर कर्ण शर्माला उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, बीसीसीआयने अद्याप सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेचे कोणतेही वेळापत्रक जाहीर केलेले नाही.