मुंबई - उत्तेजक द्रव्य प्रकरणी बंदीच्या शिक्षेनंतर पृथ्वी शॉने दमदार पुनरागमन केले. त्याने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत बडोद्याच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत झंझावती द्विशतक झळकावलं.
काही महिन्यांपूर्वी उत्तेजक द्रव्य चाचणीमध्ये पृथ्वी दोषी आढळल्याने त्याच्यावर ८ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. या बंदीनंतर मैदानात उतरत पृथ्वीने आतापर्यंत सातत्याने दमदार फलंदाजी केली आहे. यापूर्वी झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतही पृथ्वीने तीन अर्धशतके झळकावली होती.
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेनंतर पृथ्वीने आपला फॉर्म कायम राखला आहे. त्याने आता रणजी करंडक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात द्विशतकी खेळी साकारत भारतीय संघाचे दार ठोठावले आहे.
-
Maiden first-class double hundred for Prithvi Shaw, 201* from 174 balls including 19 fours and 7 sixes against Baroda in the second innings. #RanjiTrophy pic.twitter.com/VYuMdIXhuu
— Johns (@CricCrazyJohns) December 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maiden first-class double hundred for Prithvi Shaw, 201* from 174 balls including 19 fours and 7 sixes against Baroda in the second innings. #RanjiTrophy pic.twitter.com/VYuMdIXhuu
— Johns (@CricCrazyJohns) December 11, 2019Maiden first-class double hundred for Prithvi Shaw, 201* from 174 balls including 19 fours and 7 sixes against Baroda in the second innings. #RanjiTrophy pic.twitter.com/VYuMdIXhuu
— Johns (@CricCrazyJohns) December 11, 2019
पृथ्वीने बडोद्याविरुध्दच्या या सामन्यात १७९ चेंडूंत २०२ धावांची खेळी साकारली. या खेळीत त्याने १९ चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी केली. दरम्यान, भारतीय संघ फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात पृथ्वी शॉची निवड संघात सलामीवीर म्हणून केली जाऊ शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय 'अ' संघात पृथ्वीचा समावेश करण्यात येणार आहे. कसोटी मालिकेआधी भारतीय 'अ' संघ न्यूझीलंडच्या 'अ' संघाविरुध्द एक ४ दिवसीय सामना खेळणार आहे.
हेही वाचा - भारत वि. विंडीजमध्ये वानखेडेवर आज निर्णायक टी-२० लढत.. मालिकाविजयासाठी दोन्ही संघ सज्ज
हेही वाचा - 'मी धोनीला चांगला ओळखतो, तो कधीही स्वतःला संघावर थोपवणार नाही'