कराची - पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरच्या आईचे निधन झाले आहे. त्याची आई नसीम अख्तर यांचे सोमवारी रात्री कराची येथील रुग्णालयात निधन झाले. याची माहिती स्वत: आमीरने ट्विटवर दिली आहे.
आमिरने सोमवारी रात्री १ वाजता ट्विटरवरून ही माहिती दिली, की माझी आई या जगात राहिली नाही. आमिरच्या आईच्या निधनानंतर क्रिकेटजगातातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
आईच्या मृत्यूच्या एक दिवस आधी आमिरने क्रिकेटप्रेमींना त्याच्या आईसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली होती. पीएसएलमध्ये आमिर कराची किंग्जकडून खेळत आहे. आईची प्रकृती खालावल्याचे वृत्त समजताच तो यूएईवरून मायदेशी परतला होता.