कराची - पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) पुढील महिन्यापर्यंत आपल्या खेळाडूंना कोरोना लस देण्याची योजना आखत आहे. पीसीबीचे मुख्य कार्यकारी वसीम खान यांनी ही माहिती दिली.
हेही वाचा - विरुष्काच्या मुलीचे नाव आले समोर, अनुष्का शर्माने शेअर केली पोस्ट
वसीम खान म्हणाले, ''अनेक पर्यायांवर विचार केला जात आहे. शिवाय, पीसीबीच्या वैद्यकीय पॅनेलकडून सल्लाही घेण्यात आला आहे. आतापर्यंत कसोटी खेळणार्या कोणत्याही देशाने आपल्या खेळाडूंच्या लसीकरणाचा अंतिम निर्णय घेतला नाही परंतु आम्ही काही पर्यायांवर विचार करीत आहोत. मला वाटते की, आम्ही पुढील महिन्यापर्यंत खेळाडू आणि पाकिस्तान संघाच्या अधिकाऱयांच्या लसीकरणासाठी एक योजना तयार करू."
आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा झाली आहे. मोहम्मद वसीम यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने हा संघ जाहीर केला. गद्दाफी स्टेडियमवर हे सामने ११, १३ आणि १४ फेब्रुवारीला खेळवले जातील.
पाकिस्तान संघ -
बाबर आझम (कर्णधार), आमेर यामीन, आमद बट, आसिफ अली, दानिश अझीझ, फहीम अशरफ, हैदर अली, हारीस रौफ, हसन अली, हुसेन तलत, इफ्तिखद अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, सरफराज अहमद , शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान कादिर, जफर गोहर आणि जाहिद मेहमूद.