मुंबई - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ क्वारंटाईन सेंटरमधील आहे. त्या क्वारंटाईन सेंटरमधील लोकं चक्क क्रिकेट सामना खेळताना दिसत आहेत. यावर ओमर अब्दुल्ला यांनी मजेशीर रिअॅक्शन दिली आहे.
भारतामध्ये एखाद्या पंथाप्रमाणे रुजलेला क्रिकेट हा खेळ म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. जिथे जागा मिळेल तिथे क्रिकेट खेळण्यास सुरूवात करणारी मंडळी आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतील. पण आता तर चक्क क्वारंटाईन सेंटरमध्येच क्रिकेटचा सामना रंगला. ओमर यांनी या सामन्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी या व्हिडिओ, 'जागा मिळाली तर खेळणार, क्वारंटाईन टाईमपास', असे मजेशीर कॅप्शन दिले आहे.
व्हिडिओच्या सुरूवातीला एक तरुण मास्क घालून फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. त्यासोबत अनेक तरुणही दिसून येत आहेत. कॅमेरा जसा फिरवला जातो, त्यात क्वारंटाईन सेंटरमधील सर्व दृश्य दिसत आहेत. यात काही लोक बेडवर आराम करताना दिसून येत आहेत. हा व्हिडिओ नेमकं कोणत्या क्वारंटाईन सेंटरचा आहे, याची माहिती मिळू शकली नाही.
-
Have space, will play. Quarantine time pass. 🏏 pic.twitter.com/2rYZFUrGVl
— Omar Abdullah (@OmarAbdullah) June 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Have space, will play. Quarantine time pass. 🏏 pic.twitter.com/2rYZFUrGVl
— Omar Abdullah (@OmarAbdullah) June 10, 2020Have space, will play. Quarantine time pass. 🏏 pic.twitter.com/2rYZFUrGVl
— Omar Abdullah (@OmarAbdullah) June 10, 2020
अब्दुल्ला यांनी शेअर केलेला व्हिडिओ नेटिझन्सच्या चांगल्याच पसंतीस उतरला आहे. ३७ सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. आतापर्यंत १ लाखहून अधिक वेळा हा व्हिडिओ पाहण्यात आला आहे तर ५ हजाराहून जास्त लाईक्स आणि ४८५ हून अधिक रिट्वीट करण्यात आले आहेत.
हेही वाचा - आयसीसीची झाली बैठक; टी-२० विश्वकरंडकाबाबत घेतला 'हा' निर्णय, IPL ला मोठा धक्का
हेही वाचा - 'IPL आयोजनाबाबत सर्व पर्यायांची चाचपणी सुरू, वेळ पडली तर प्रेक्षकांविना सामने खेळवू'