नवी दिल्ली - जगभरातील स्फोटक फलंदाजांच्या यादीत वेस्ट इंडीजचा सलामीवीर फलंदाज ख्रिस गेलचा समावेश आहे. त्यांची बॅट तळपते तेव्हा तो प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांची पळता भुई करतो. असा हा धाकड फलंदाज मागील काही दिवसांपासून लयीत नाही. यामुळे त्याने टी-२० लीगमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
गेलने खराब फॉर्ममुळे दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात येत असलेल्या मझांसी सुपर लीग (Mzansi Super League) मधून माघार घेतली आहे. या विषयी बोलताना गेल म्हणाला, 'मी जेव्हा ३-४ सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरतो. त्यावेळी मी संघावरचं ओझं ठरतो'
दरम्यान, क्रिकेटच्या सर्व प्रकारात गेलने आक्रमक फलंदाजी केली आहे. टी-२० मध्ये तर तो संघाचा हुकमी एक्का ठरतो. पण, मझांसी लीगमध्ये त्याला ६ सामन्यात केवळ एका अर्धशतकासह १०१ धावा करत्या आल्या आहेत. त्यामुळे तो टीकेचा धनी ठरला. यामुळे त्याने पत्रकार परिषद घेत लीगमधून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे.
मी जेव्हा चांगला खेळ करतो. तेव्हा सन्मान मिळतो. पण ज्यावेळी मी अपयशी ठरतो. तेव्हा मात्र मी सर्वात खराब खेळाडू ठरतो. मी हे केवळ एका संघाबाबत सांगत नाही. मी विविध टी-२० लीग क्रिकेट स्पर्धेत अनेक वर्षे खेळलो आहे, त्यात मी जे अनुभवले ते सांगत असल्याचे गेल म्हणाला.
हेही वाचा - माझ्यामुळेच भारताचे विश्वविजेता होण्याचे स्वप्न भंगले - विराट कोहली
हेही वाचा - महेंद्रसिंह धोनीला आम्हाला द्या, 'या' क्रिकेट बोर्डाने केली बीसीसीआयकडे मागणी