नवी दिल्ली - वेस्ट इंडीजने भारताविरुध्दच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. विडींज निवड समितीने आंद्रे रसेल, ड्वेन ब्राव्हो यासारख्या स्फोटक खेळाडूंना संभाव्य संघात स्थान दिलेले नाही. तर दुसरीकडे किरॉन पोलार्डकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे.
वेस्ट इंडीजचा संघ भारत दौऱ्यात ३ सामन्यांची टी-२० आणि ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी वेस्ट इंडीजने संघ जाहीर केला. यात आंद्रे रसेल आणि माजी कर्णधार ड्वेन ब्राव्हो यांना स्थान देण्यात आलेले नाही. शाय होपला टी-२० संघातून वगळण्यात आले आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर फिरकीपटू फॅबियन ऍलन आणि दिनेश रामदीन यांचे संघात पुनरागमन झाले आहे.
-
🚨BREAKING🚨: WEST INDIES ANNOUNCE ODI & T20I SQUADS AHEAD OF INDIA TOUR NEXT MONTH pic.twitter.com/4dti4LdAOD
— Windies Cricket (@windiescricket) November 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">🚨BREAKING🚨: WEST INDIES ANNOUNCE ODI & T20I SQUADS AHEAD OF INDIA TOUR NEXT MONTH pic.twitter.com/4dti4LdAOD
— Windies Cricket (@windiescricket) November 28, 2019🚨BREAKING🚨: WEST INDIES ANNOUNCE ODI & T20I SQUADS AHEAD OF INDIA TOUR NEXT MONTH pic.twitter.com/4dti4LdAOD
— Windies Cricket (@windiescricket) November 28, 2019
विंडीज-भारत दौर्याला ६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. टी-२० मालिकेतील पहिला सामना हैदराबाद, दुसरा सामना तिरुअनंतपूरम (८ डिसेंबर) आणि तिसरा सामना मुंबई (११ डिसेंबर) येथे होणार आहे. त्यानंतर या दोन संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होईल. या मालिकेचा पहिला सामना चेन्नई (१५ डिसेंबर), दुसरा सामना विशाखापट्टणम (१८ डिसेंबर) आणि तिसरा सामना कटक (२२ डिसेंबर) येथे होणार आहे.
- विंडीजचा एकदिवसीय संघ -
- किरॉन पोलार्ड (कर्णधार), सुनिल अँब्रिस, शाय होप, खारी पिएर, रोस्टन चेस, अल्झारी जोसेफ, शेल्डन कॉट्रेल, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, एविन लुईस, रोमारिओ शेफर्ड, जेसन होल्डर, किमो पॉल आणि हेडन वॉल्श ज्युनिअर.
- विंडीजचा टी-२० संघ -
- किरॉन पोलार्ड (कर्णधार), फॅबिअन एॅलन, शेल्डन कॉट्रेल, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, किमो पॉल, ब्रँडन किंग, एविन लुईस, खारी पिएर, निकोलस पूरन, दिनेश रामदीन, शर्फेन रुदरफोर्ड, लेंडल सिमन्स, केसरिक विल्यम्स आणि हेडन वॉल्श ज्युनिअर.