ETV Bharat / sports

IPL २०२० : परदेशी खेळाडूंना भारतात प्रवेश बंदी, केंद्र सरकारने घातले निर्बंध - कोरोनाचा इफेक्ट आयपीएलवर

चीनमधून प्रसार झालेल्या कोरोना विषाणूने जगभरातील १०० हून अधिक देशांसह भारतातही फैलाव केला आहे. यामुळे आयपीएल स्पर्धा रद्द करण्याची मागणी जोर धरली. तेव्हा केंद्र सरकारने परदेशी नागरिकांच्या व्हिसा देण्यावर निर्बंध घातले आहेत. यामुळे आयपीएलमध्ये खेळणारे परदेशी खेळाडू १५ एप्रिलपर्यंत भारतात येऊ शकणार नाहीत. पण, आयपीएलचा १३ वा हंगाम येत्या २९ मार्चपासून नियोजित आहे.

No foreign player available for IPL till April 15 due to visa restrictions imposed by government in wake of COVID-19 outbreak: BCCI source
IPL २०२० : परदेशी खेळाडूंना भारतात प्रवेश बंदी, केंद्र सरकारने घातले निर्बंध
author img

By

Published : Mar 12, 2020, 3:08 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे केंद्र सरकारने परदेशी नागरिकांच्या प्रवासावर १५ एप्रिलपर्यंत निर्बंध घातले आहेत. यामुळे कोणतेही परदेशी खेळाडू आयपीएल स्पर्धेसाठी उपलब्ध असणार नाहीत, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी म्हटले आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

  • No foreign player available for IPL till April 15 due to visa restrictions imposed by government in wake of COVID-19 outbreak: BCCI source

    — Press Trust of India (@PTI_News) March 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

चीनमधून प्रसार झालेल्या कोरोना विषाणूने जगभरातील १०० हून अधिक देशांसह भारतातही फैलाव केला आहे. यामुळे आयपीएल स्पर्धा रद्द करण्याची मागणी जोर धरली. यात केंद्र सरकारने परदेशी नागरिकांच्या व्हिसा देण्यावर निर्बंध घातले आहेत. यामुळे आयपीएलमध्ये खेळणारे परदेशी खेळाडू १५ एप्रिलपर्यंत भारतात येऊ शकणार नाहीत. पण, आयपीएलचा १३ वा हंगाम येत्या २९ मार्चपासून नियोजित आहे.

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यासंदर्भातील बोलणी सुरू असल्याचे सांगितले आहे. तसेच कर्नाटक सरकारने आयपीएल स्पर्धा रद्द अथवा पुढे ढकला, अशी मागणी केंद्र सरकारकडे पत्राव्दारे केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आयपीएल रद्द करण्यासंदर्भात मद्रास उच्च न्यायालयात याचिका देखील करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने व्हिसा निर्बंधातून सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वगळले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे जगभरात ४ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात याचे ६० हून अधिक रुग्ण आढळले आहेत.

हेही वाचा - खळबळजनक..! महिला टी-२० विश्वकरंडकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी आला होता कोरोनाग्रस्त

हेही वाचा - IND VS SA : भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यावर पावसाचे सावट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.