हैदराबाद - भारतीय संघाने न्यूझीलंडला पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात ७ धावांनी धूळ चारली आणि मालिकेत ५-० ने निर्भेळ यश मिळवले. या मालिकेतील २ सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. हा अपवाद वगळता भारतीय संघाने राहिलेल्या तीन सामन्यात जवळपास एकतर्फा विजय मिळवला. दरम्यान, पाचव्या पराभवानंतर न्यूझीलंडच्या नावे एक लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली. न्यूझीलंड जगातील सर्वाधिक टी-२० सामने हरणारा संघ ठरला आहे.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने गमावणारे संघ -
- न्यूझीलंड - ६५ वेळा पराभूत
- श्रीलंका - ६४ वेळा पराभूत
- वेस्ट इंडीज - ६३ वेळा पराभूत
- बांगलादेश - ६२ वेळा पराभूत
- पाकिस्तान - ५७ वेळा पराभूत
इतकेच नव्हे तर मायदेशात सर्वाधिक टी-२० सामने गमावणारा संघही न्यूझीलंड ठरला. न्यूझीलंडने २३ सामने मायदेशात खेळताना गमावले आहेत.
मायदेशात सर्वाधिक टी-२० सामने गमावणारे संघ -
- २३ पराभव - न्यूझीलंड ( ५९ पैकी )
- २३ पराभव - श्रीलंका ( ४० पैकी )
- २२ पराभत - बांगलादेश ( ३७ पैकी )
- २२ पराभत - दक्षिण अफ्रिका ( ५७ पैकी )
- २१ पराभव - झिम्बाब्वे ( २४ पैकी )
- २० पराभव - वेस्ट इंडीज ( ४३ पैकी )
हेही वाचा - IND vs NZ : न्यूझीलंडला 'व्हाईट वॉश', पाचव्या टी-२० सह भारताचा ५-० ने ऐतिहासिक मालिका विजय
हेही वाचा - Video : संजू सॅमसन नव्हे 'सुपरमॅन', हवेत उडी मारत रोखला षटकार