लाहोर - दानिश कनेरियासंदर्भातील माझ्या वक्तव्याचे चुकीचे वर्णन केले गेले असल्याचे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने स्पष्ट केले आहे. 'हिंदू असूनही पाकिस्तानी संघात कनेरियाने गैरवर्तन केले असल्याचे मी कधीच म्हटले नव्हते', अशी पलटी अख्तरने मारली असून पाकिस्तानी संघात अशी संस्कृती यापूर्वी कधीही नव्हती आणि विशेषत: धर्माच्या आधारे कोणत्याही खेळाडूशी भेदभाव केलेला नसल्याचेही अख्तरने म्हटले आहे.
हेही वाचा - ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पीटर सिडलचा क्रिकेटला रामराम
या मुद्द्यांवरून सुरू असलेल्या वादाचे वर्णन करण्यासाठी अख्तरने आपल्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये अख्तर म्हणाला, 'मी हे संपूर्ण प्रकरण पाहिले. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. आम्हाला प्रत्येक खेळाडूचा सन्मान करावा लागला परंतु तेथे एक-दोन खेळाडू होते ज्यांनी कनेरियाला लक्ष्य केले. असे खेळाडू सर्वत्र असतात पण त्यांना संघातील प्रत्येक सदस्याचे पाठबळ मिळते असे नाही.'
पाकिस्तानी संघात जर काही खेळाडू असतील तर तो संघात नको होता कारण तो हिंदू धर्माचा होता, असा आरोप अख्तरने गुरुवारी केला होता. यानंतर स्पॉट फिक्सिंगमुळे निर्बंधाला सामोरे जाणाऱ्या कनेरियाने असे म्हटले होते की, असेही काही खेळाडू आहेत ज्यांनी त्याला लक्ष्य केले होते. परंतु, धर्मांतर करण्यासाठी त्याच्यावर कधीही दबाव आणला जात नव्हता.
शनिवारी माजी कर्णधार इंझमाम-उल-हक यानेही सांगितले की, कनेरिया माझ्या नेतृत्वात खेळला आणि यावेळी त्याच्याशी काही चुकीचे वर्तन करण्यात आल्याचे मला जाणवले नव्हते.