मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात कमी झाला आहे. यामुळे देशाअंतर्गत क्रिकेट स्पर्धेला सुरूवात करण्यात आली आहे. आजपासून मुश्ताक अली करंडक टी-२० स्पर्धेच्या मोसमाला प्रारंभ होत आहे. हिमाचल आणि छत्तीसगड यांच्यात स्पर्धेतील पहिला सामना खेळला जाणार आहे.
मुश्ताक अली करंडक स्पर्धेच्या माध्यमातून नव्या चेहऱ्यांना व्यासपीठ मिळते. तसेच ही स्पर्धा आयपीएल लिलावाआधी होत आहे. यामुळे या स्पर्धेद्वारे खेळाडूंना चमक दाखवण्याचे एक मोठे व्यासपीठ मिळाले आहे. याशिवाय शिखर धवन, सुरेश रैना आणि इशांत शर्मासारखे खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेट मैदानात पुनरागमन करतील.
एस. श्रीशांत देखील ही स्पर्धा खेळणार आहे. २०१३ मध्ये आयपीएलमधील मॅच फिक्सिंगप्रकरणी श्रीशांतवर बंदी घालण्यात आली होती. बंदीनंतर तो पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
ऋतुराज गायकवाड, प्रियम गर्ग, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, सर्फराझ खान, आर. साईकिशोर आणि एम. सिद्धार्थ हे नव्या दमाचे खेळाडू या स्पर्धेत आपली छाप सोडण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यांच्या कामगिरीवर निवड समितीचे लक्ष असणार आहे. दरम्यान, ही स्पर्धा कोरोनाच्या सावटाखाली होत असल्याने, याचे आयोजन जैवसुरक्षा वातावरणात सहा वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले आहे.
हेही वाचा - IND VS AUS : ऋषभ पंतला दुखापत, वृद्धीमान साहा यष्टीरक्षणासाठी मैदानावर
हेही वाचा - Ind vs Aus : पंतपाठोपाठ जडेजालाही दुखापत, भारतीय संघ अडचण