ETV Bharat / sports

IPL: अंतिम फेरीच्या तिकीटासाठी चेन्नई आणि मुंबईत रंगणार 'महामुकाबला' - IPL

यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई आणि मुंबई संघाने प्रत्येकी १४ पैकी ९ सामने जिंकून १८ गुण मिळवले आहेत. मात्र, नेट रन रेटच्या जोरावर मुंबईच्या संघाने पहिले स्थान काबीज केले आहे.

चेन्नई आणि मुंबई
author img

By

Published : May 6, 2019, 6:47 PM IST

मुंबई - साखळी सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करणारे चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स अंतिम फेरीच्या तिकीटासाठी एकमेकांशी भिडणार आहेत. या दोन संघामधील कोणता संघ अंतिम फेरीचे पहिले तिकीट पटकावतो याचा निर्णय मंगळवारी क्वॉलिफायर-1 च्या सामन्यात होणार आहे. सुपर किंग्जच्या घरच्या मैदानावर म्हणजेच, चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम क्रिकेट स्टेडियमवर रात्री ८ वाजता क्वालिफायर-१ सामन्याला सुरुवात होईल.

मंगळवारी होणाऱ्या क्वालिफायर-१ सामन्यात जो संघ विजय मिळवेल तो संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत होणाऱ्या संघाला क्वालिफायर-२ सामना खेळून फायनल तिकीट मिळवण्याची दुसरी संधी मिळेल.

मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स

आयपीलच्या या सत्रात चेन्नई आणि मुंबई २ वेळा आमने सामने आले असून, दोन्ही वेळा मुंबईच्या संघाने विजय मिळवला आहे. त्यामुळे चेन्नईला या सामन्यात मुंबईवर विजय मिळवायचा असल्यास सर्वस्व पणाला लावून खेळावे लागले.

आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नई या दोन संघांनी आजवर सर्वाधिक तीन-तीन वेळा जेतेपद पटकावले आहे.

असे असतील दोन्ही संघ

  • चेन्नई सुपर किंग्ज - महेंद्रसिंह धोनी (कर्णधार ), सुरेश रैना, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, फाफ डय़ू प्लेसिस, मुरली विजय, ड्वेन ब्राव्हो, मोहित शर्मा, के. आसिफ, डेव्हिड विली, दीपक चहर, एन जगदीशन, सॅम बिलिंग्स, रवींद्र जडेजा, ध्रुव शोरे, चैतन्य बिश्नोई, ऋतुराज गायकवाड, कर्ण शर्मा, इम्रान ताहीर, हरभजन सिंग, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर.
  • मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी’कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, युवराज सिंग, किरॉन पोलार्ड, हार्दिक पंडय़ा, कृणाल पंडय़ा, मिचेल मॅक्क्लिनॅघन, मयांक मरकडे, राहुल चहर, जसप्रीत बुमरा, अनमोलप्रीत सिंग, सिद्धेश लाड, अनुकूल रॉय, एव्हिन लेविस, पंकज जैस्वाल, बेन कटिंग, इशान किशन (यष्टीरक्षक), आदित्य तरे, रसिक सलाम, बिरदर शरण, जयंत यादव, ब्युरन हेंड्रिक्स, लसिथ मलिंगा.

Intro:Body:

sports

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.