फ्लोरिडा - भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला आजपासून सुरुवात होणार असून दोन्ही संघात आज प्लोरिडा येथील मैदानावर पहिला टी-२० सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पत्रकारांशी वार्तालाप केला. यामध्ये त्याने पत्रकारांच्या प्रश्नाला दिलखुलास उत्तरे दिली.
-
MS Dhoni's absence is the perfect opportunity for @RishabhPant17 to gain experience and unleash his potential - #TeamIndia Captain @imVkohli ahead of the 1st T20I against West Indies.#WIvIND pic.twitter.com/1r3QjpuLZl
— BCCI (@BCCI) August 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">MS Dhoni's absence is the perfect opportunity for @RishabhPant17 to gain experience and unleash his potential - #TeamIndia Captain @imVkohli ahead of the 1st T20I against West Indies.#WIvIND pic.twitter.com/1r3QjpuLZl
— BCCI (@BCCI) August 3, 2019MS Dhoni's absence is the perfect opportunity for @RishabhPant17 to gain experience and unleash his potential - #TeamIndia Captain @imVkohli ahead of the 1st T20I against West Indies.#WIvIND pic.twitter.com/1r3QjpuLZl
— BCCI (@BCCI) August 3, 2019
यावेळी बोलताना विराट म्हणाला, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतसाठी या दौऱ्यात मोठी संधी आहे. तो पूर्ण क्षमतेने खेळल्यास त्याची कारकिर्द मोठी होईल. पंतसाठी त्याची क्षमता दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे. आम्हाला त्याच्या क्षमतेबद्दल कल्पना आहे. त्याने भारतीय संघासाठी चांगली कामगिरी करावी, अशी आमची इच्छा आहे.
महेंद्र सिंह धोनीच्या निवृत्तीबद्दल सध्या काही स्पष्ट नसले तरी भविष्यात यष्टीरक्षणाची जबाबदारी पंतच्या खांद्यावर असणार आहे. यामुळे पंतने या संधीचे सोने केले पाहिजे, असे विराट म्हणाला. दरम्यान विराट दौऱ्याच्या काही दिवसापूर्वी श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे यांना मधल्या फळीसाठी दावा करण्यासाठी हा दौरा एक चांगली संधी असल्याचे म्हणाला होता.
धोनीविषयी बोलताना विराट म्हणाला, धोनी अनुभवी खेळाडू असून त्याचा अनुभव संघासाठी नेहमीच महत्वाचा राहिला आहे. आता या दौऱ्यात युवा खेळाडूंना संधी मिळाली असून त्यासाठी नविन खेळाडूंनी तयार राहिले पाहिजे, असं त्यानं सांगितलं.