ETV Bharat / sports

सामन्यानंतरच्या वागणुकीमुळे धोनी चर्चेत...पाहा व्हिडिओ - dhoni interacts with kl rahul

किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध विजय मिळवल्यानंतर धोनी पंजाबचा कर्णधार केएल राहुल आणि सलामीवीर मयांक अग्रवालशी चर्चा करताना दिसून आला. धोनीच्या या वागणुकीचे कौतुक झाले आहे.

ms dhoni sharing tips to kl rahul after match in  ipl 2020
सामन्यानंतरच्या वागणुकीमुळे धोनी चर्चेत...पाहा व्हिडिओ
author img

By

Published : Oct 5, 2020, 3:56 PM IST

दुबई - आयपीएलचा अठरावा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात खेळला गेला. या सामन्यात एकही बळी न गमावता चेन्नईने आपली या हंगामातील पराभवाची मालिका खंडित करत पंजाबवर विजय प्राप्त केला. पंजाबने दिलेल्या १७९ धावांचे आव्हान चेन्नईच्या सलामीवीर जोडीने अर्थात फाफ डु प्लेसिस आणि शेन वॉटसनने पूर्ण केले. या सामन्यानंतर धोनी पंजाबचा कर्णधार केएल राहुल आणि सलामीवीर मयांक अग्रवालशी चर्चा करताना दिसून आला.

यापूर्वी, अनेकदा सामन्यानंतर धोनी खेळाडूंशी चर्चा करताना दिसला आहे. त्यामुळे धोनीच्या या वागणुकीचे कौतुक झाले आहे. यंदाच्या हंगामात सलग तीन पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्जने दहा गडी राखून दमदार विजय मिळवला. सामना संपल्यानंतर धोनी म्हणाला, ''पंजाबला कमी धावांमध्ये रोखणे महत्वपूर्ण ठरले. पहिल्या चार सामन्यातील अनुभव पाहता, आम्ही कमीत कमी धावांमध्ये पंजाबला रोखण्याची रणनिती आखली होती. सर्व संघांकडे आक्रमक फलंदाज आहेत. जे कोणत्याही गोलंदाजाला फोडून काढू शकतात. पण पंजाबविरुद्धच्या सामन्यात आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली.''

चेन्नईचा पुढील सामना ७ ऑक्टोबरला कोलकाता नाइट रायडर्सशी होणार आहे. तर पंजाबचा पुढील सामना ८ ऑक्टोबरला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.