दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे कौतुक करत आहे. इशांत म्हणाला, एक कर्णधार आणि अनुभवी खेळाडू म्हणून धोनीने त्याला मदत करत त्याचे करिअर वाचविले. माही माझ्यासाठी अनेक अडचणीत धावून आल्याचेही इंशातने यावेळी सांगितले.
इशांत म्हणाला, मी जर चांगली कामगिरी केली तर विश्वचषकासाठी दावा करू शकतो. जो खेळाडू कसोटीत चांगली कामगिरी करू शकतो तो चेंडूवर झटपट क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करू शकतो. फक्त कामगिरीत सातत्य हवे.
महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली करिअरला सुरुवात करणारा इशांत सध्या विराटच्या नेतृत्वाखाली कसोटी संघाचा सदस्य आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये इशांत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. इशांत आतापर्यंत ९० कसोटी सामने खेळला असून त्यात त्याने २६७ बळी घेतले आहेत.