ETV Bharat / sports

मोहम्मद हाफिज 'या' स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेणार निवृत्ती - विश्व करंडक स्पर्धेनंतर हाफिज निवृ्त्ती घेणार

मोहम्मद हाफिजने २००३ मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हाफिजने ५५ कसोटी सामने खेळली असून त्याने डिसेंबर २०१८ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. २१८ एकदिवसीय सामने खेळताना त्याने ६६१४ धावा केल्या आहेत. यात ११ शतकांचा समावेश आहे. तर गोलंदाजीत त्याने १३९ गडी बाद केले आहेत.

mohammed hafeez announces that he will retire from international cricket after t20 world cup 2020
मोहम्मद हाफिज 'या' स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेणार निवृत्ती
author img

By

Published : Jan 18, 2020, 8:51 AM IST

कराची - पाकिस्तान संघाचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफिजने, ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्व करंडक स्पर्धेनंतर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेणार असल्याचे जाहीर केले आहे. ३९ वर्षीय हाफिजने शुक्रवारी यांची घोषणा केली. दरम्यान, मागील काही महिन्यानंतर संघाबाहेर असलेल्या हाफिजची २४ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या बांगलादेशविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली आहे.

मोहम्मद हाफिजने २००३ मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. हाफिजने ५५ कसोटी सामने खेळली असून त्याने डिसेंबर २०१८ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. २१८ एकदिवसीय सामने खेळताना त्याने ६६१४ धावा केल्या आहेत. यात ११ शतकांचा समावेश आहे. तर गोलंदाजीत त्याने १३९ गडी बाद केले आहेत.

टी-२० क्रिकेटमध्ये ८९ सामन्यात पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व करताना हाफिजने १९०८ धावा केल्या आहेत. तर त्यासोबत त्याने ५४ गडीही बाद केले आहेत.

हाफिजने सांगितले की, 'पाकिस्तानसाठी खेळणे माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. मी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्व करंडक खेळू इच्छित आहे. यानंतर मी क्रिकेटमधून निवृत्ती घोषित करु इच्छितो.'

हेही वाचा - भारतीय संघाच्या ८७ वर्षीय 'सुपरफॅन' चारुलता पटेल यांचं निधन

हेही वाचा - ICC Awards : रोहित 'सर्वोत्कृष्ट' तर विराट 'स्पिरीट ऑफ क्रिकेट'

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.