मुंबई - पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज मोहम्मद हाफीजने, आपले जगातील ५ सर्वश्रेष्ठ फलंदाज निवडले आहेत. हाफिजच्या या यादीत सचिन तेंडुलकर आणि कर्णधार विराट कोहली याचाही समावेश आहे.
सद्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे क्रीडाविश्व ठप्प पडले असून, कुठेही कोणतीही स्पर्धा सुरू नाही. पण खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहेत. मोहम्मद हाफिजने आपल्या चाहत्याशी ट्विटरच्या माध्यमातून संवाद साधला. तेव्हा एका चाहत्याने त्याला, तुझे जगातील सर्वश्रेष्ठ पाच फलंदाज कोण आहेत? असा सवाल केला.
-
Lets start Q/A session #AskMH
— Mohammad Hafeez (@MHafeez22) April 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Lets start Q/A session #AskMH
— Mohammad Hafeez (@MHafeez22) April 1, 2020Lets start Q/A session #AskMH
— Mohammad Hafeez (@MHafeez22) April 1, 2020
यावर हाफिजने उत्तर देताना सांगितले की, ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, सईद अन्वर आणि एबी डिव्हिलियर्स हे माझे सर्वश्रेष्ठ फलंदाज आहेत.
-
@BrianLara @sachin_rt @imVkohli Saeed Anwar & @ABdeVilliers17
— Mohammad Hafeez (@MHafeez22) April 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">@BrianLara @sachin_rt @imVkohli Saeed Anwar & @ABdeVilliers17
— Mohammad Hafeez (@MHafeez22) April 1, 2020@BrianLara @sachin_rt @imVkohli Saeed Anwar & @ABdeVilliers17
— Mohammad Hafeez (@MHafeez22) April 1, 2020
दरम्यान, मोहम्मद हाफिज पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच, ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वकरंडक खेळून, निवृत्तीची इच्छा व्यक्त केली आहे. पण टी-२० विश्वकरंडकावर कोरोनाचे सावट आहे.
चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ४७ हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पाकिस्तानमध्येही कोरोना रुग्णांची संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे पाकिस्तान सरकार चिंतेत आहे.
हेही वाचा - लढा कोरोनाविरुद्धचा : गंभीरने ठेवला खासदारांसमोर आदर्श, दिला २ वर्षांचा पगार
हेही वाचा - सचिन अझरला म्हणाला होता.. 'एक संधी द्या फेल झालो तर पुन्हा येणार नाही', काय आहे प्रकरण