ETV Bharat / sports

कोरोनावर मात करत मोईन अली इंग्लंड संघात दाखल - moeen ali NEWS

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने कोरोनावर मात केली आहे. तो संघासोबत जोडला गेला आहे. इंग्लंडचा संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्याला सुरूवात होण्याआधीच मोईन अलीला कोरोना झाल्याचे समोर आले होते.

कोरोनावर मात करत मोईन अली इंग्लंड संघात दाखल

author img

By

Published : Jan 17, 2021, 7:37 AM IST

गाले (श्रीलंका) - इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने कोरोनावर मात केली आहे. तो संघासोबत जोडला गेला आहे. इंग्लंडचा संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्याला सुरूवात होण्याआधीच मोईन अलीला कोरोना झाल्याचे समोर आले होते. यामुळे त्याच्यावर उपचार सुरू होते.

इंग्लंडचा संघ श्रीलंका दौऱ्यावर निघाला असता, सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. यात सर्व खेळाडूंचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यानंतर इंग्लंडचा संघ जेव्हा हंबनटोटा येथे दाखल झाला. तेव्हा पुन्हा खेळाडूंची चाचणी करण्यात आली. यात मोईन अलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यामुळे त्याला संघातील खेळाडूंपासून वेगळे ठेवण्यात आले होते. तसेच त्याच्यावर उपचार सुरू होते.

एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, मोईन अलीचा क्वारंटाइन अवधी १० दिवसांचा होता. परंतु त्याला कोरोना झाल्याचे समोर आल्याने श्रीलंका सरकारने हा कालावधी १३ दिवसांचा केला.

मोईन अलीचा सहकारी सॅम करनने सांगितले की, मोईनची संघात वापसी ही आनंददायी बाब आहे. जेव्हा आम्ही एका सत्राचा खेळ संपल्यानंतर चेंजिग रुममध्ये गेलो. तिथे मोईन अलीला पाहून आम्हाला बरं वाटले.

दरम्यान, उभय संघात पहिला कसोटी सामना गाले येथे खेळला जात आहे. श्रीलंकेचा संघ या सामन्यातील पहिल्या डावात १३५ धावांत ढेपाळला. त्यानंतर इंग्लंड संघाने पहिल्या डावात ४२१ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेने दुसऱ्या डावात २ बाद १५६ धावा केल्या आहेत. श्रीलंकेचा संघ अद्याप १३० धावांनी पिछाडीवर आहे.

हेही वाचा - गाबा कसोटी : पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, रोहित-शुबमन माघारी

हेही वाचा - वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी बांग्लादेश संघाची घोषणा; शाकिबची वापसी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.