मेलबर्न - ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग महिला बिग बॅश लीगच्या (डब्ल्यूबीबीएल) आगामी हंगामात मेलबर्न स्टार्सचे नेतृत्व करणार आहे. गेल्या हंगामात संघाचे नेतृत्व करणाऱ्या एलिस विलानीकडून ती कर्णधारपदाचा भार आपल्याकडे घेईल. सुरुवातीच्या दोन हंगामात लॅनिंगने संघाचे नेतृत्व केले होते.
-
Pleased to announce Meg Lanning as the new captain of the Melbourne Stars 💚#TeamGreen
— Melbourne Stars (@StarsBBL) September 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Pleased to announce Meg Lanning as the new captain of the Melbourne Stars 💚#TeamGreen
— Melbourne Stars (@StarsBBL) September 22, 2020Pleased to announce Meg Lanning as the new captain of the Melbourne Stars 💚#TeamGreen
— Melbourne Stars (@StarsBBL) September 22, 2020
लॅनिंग म्हणाली, "मी पुन्हा एकदा मेलबर्न स्टार्सचे कर्णधारपद भूषवण्यास तयार आहे. विलानीने जे काम केले आहे ते पुढे नेण्याची माझी इच्छा आहे. कर्णधार होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. आमच्या संघाकडे पाहून मी आनंदी आहे. पुन्हा क्रिकेट खेळणार असल्याने मी जास्त आनंदी असेन."
फ्रेंचायझीने अष्टपैलू क्रिकेटपटू भावी देवचंदाशीही करार केला आहे. देवचंदाविषयी लॅनिंग म्हणाली, "भाविश स्टार्स संघात नक्कीच नवीन आहे. तिच्या आगमनामुळे आम्ही खूष आहोत. मला खात्री आहे, की ती या संधीचा पुरेपूर फायदा घेईल."