धर्मशाळा - भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यातील अपयश झटकून आजपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होत असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन झाल्याने भारतीय संघाला बळकटी मिळाली आहे. पण, धर्मशाळा येथील पहिल्या सामन्यावर पावसाचे सावट आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील आज धर्मशाळा येथे पहिला एकदिवसीय सामना आज खेळला जाणार आहे. या मालिकेद्वारे हार्दिकचे संघात पुनरागमन झाले आहे. सलामीवीर शिखर धवन आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारसुद्धा भारतीय संघातील स्थान पक्के करण्यासाठी आतूर आहेत.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधार कोहली, के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्यावर फलंदाजीची भिस्त आहे. जसप्रीत बुमराह भारताच्या गोलंदाजीचे नेतृत्व करेल. पृथ्वी शॉ-शुभमन गिल यांच्यात संघातील स्थानासाठी चढाओढ पाहण्यास मिळेल.
असा आहे भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, नवदीप सैनी आणि कुलदीप यादव.
असा आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ -
क्विंटन डिकॉक (कर्णधार), तेम्बा बावुमा, रेसी वान डेर डुसेन, फाफ डुप्लेसिस, कोली वेरीने, हेन्रिक क्लासेन, जेनमॅन मलान, डेव्हिड मिलर, जॉन-जॉन स्मट्स, एन्डिले फेहलुकवायो, लुंगी एनगिडी, लूथो सिपामला, एन्रिक नोर्टजे, ब्युरोन हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे आणि केशव महाराज.
हेही वाचा - IND VS SA : कोरोनाच्या धास्तीने भारतीय खेळाडू म्हणतो... 'ही' गोष्ट टाळणार
हेही वाचा - कोरोनाच्या धोक्यामुळे 'ही' मोठी टी-२० मालिका पुढे ढकलली