ETV Bharat / sports

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, 'हा' खेळाडू भारतीय संघाला धोकादायक ठरणार ?

ऑस्ट्रेलियाचा संघ पुढील वर्षी (२०२०) एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया बोर्डाने १४ सदस्यीय खेळाडूंचा संघ घोषित केला. यात मार्नस लाबुशेनचा समावेश करण्यात आला आहे.

marnus Labuschagne is in our Australian squad for the Qantas Tour of India next month
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, 'हा' खेळाडू भारतीय संघाला धोकादायक ठरणार ?
author img

By

Published : Dec 17, 2019, 11:58 AM IST

Updated : Dec 17, 2019, 12:56 PM IST

मेलबर्न - भारत दौऱ्यातील एकदिवसीय सामन्याच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली आहे. कसोटीत दमदार कामगिरी करणारा मार्नस लाबुशेनला एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे. आज (मंगळवार) ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने संघाची घोषणा केली असून उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, मार्कस स्टॉयनिस, नॅथन लिऑन, नॅथन कोल्टर-नील आणि ग्लेन मॅक्सवेल यांना संघातून 'डच्चू' देण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ पुढील वर्षी (२०२०) एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया बोर्डाने १४ सदस्यीय खेळाडूंचा संघ घोषित केला. यात मार्नस लाबुशेनचा समावेश करण्यात आला आहे. तर यष्टीरक्षक फलंदाज म्हणून अ‌ॅलेक्स कॅरीला संधी मिळाली आहे. जेसन बेहरेनडॉर्फला मात्र, दुखापतीमुळे या मालिकेला मुकावे लागले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची कमान डेव्हिड वार्नर, अ‌ॅरोन फिंच, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन आणि अ‌ॅलेक्स कॅरीवर असणार आहेत. तर गोलंदाजीची धुरा मिचेल स्टार्क, सीन अ‌ॅबोट, केन रिचर्डसन, जोश हेझलवूड, अ‌ॅडम झम्पा आणि अ‌ॅश्टोन टर्नर सांभाळतील.

  • JUST IN: Australia's ODI squad to tour India next month #INDvAUS

    Aaron Finch (c)
    Sean Abbott
    Ashton Agar
    Alex Carey (vc)
    Pat Cummins (vc)
    Peter Handscomb
    Josh Hazlewood
    Marnus Labuschagne
    Kane Richardson
    Steven Smith
    Mitchell Starc
    Ashton Turner
    David Warner
    Adam Zampa

    — cricket.com.au (@cricketcomau) December 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ऑस्ट्रेलिया निवड समितीने सांगितल की, 'आम्ही कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतील विजयाची मालिका कायम ठेऊन इच्छित आहेत. तसेच लाबुशेनने कसोटी चांगली कामगिरी केली आणि तो एकदिवसीय क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज आहे. यामुळे त्याची निवड संघात करण्यात आली.'

लाबुशेनने अ‌ॅशेस मालिकेपासून दमदार कामगिरी केली आहे. त्याने नुकताच संपलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या प्रकाशझोतातील कसोटी सामन्यात पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावलं आहे. दरम्यान, तो कसोटीत सातत्याने धावा करताना दिसत आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया निवड समितीने त्याला संघात स्थान दिले आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ - अ‍ॅरोन फिंच ( कर्णधार), सीन अ‍ॅबोट, अ‍ॅश्टन अ‍ॅगर, अ‍ॅलेक्स कॅरी ( यष्टिरक्षक), पॅट कमिन्स, पीटर हँड्सकोम्ब, जोश हेझलवूड, मार्नस लाबुशेन, केन रिचर्डसन, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अ‍ॅश्टन टर्नर, डेव्हीड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा.

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

  • १४ जानेवारी - मुंबई
  • १७ जानेवारी - राजकोट
  • १९ जानेवारी - बंगळुरू

हेही वाचा - कसोटी अजिंक्यपद : पाकिस्तानने गुणांचे खाते उघडले, ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

हेही वाचा - विराट आणि स्मिथसाठी लाबुशेन बनला खतरा, कसोटी क्रमवारीत ११० वरुन टॉप-५ मध्ये दाखल

हेही वाचा - हेटमायरचा 'तो' षटकार पाहून विराट कोहली हतबल, पाहा व्हिडिओ

Intro:Body:

Dummy

Conclusion:
Last Updated : Dec 17, 2019, 12:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.