ढाका - बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार शाकिब अल हसनवर आयसीसीने लाचलुचपत प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २ वर्षांची बंदी घातली आहे. यामुळे बांगलादेश संघाला भारत दौरा सुरू होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. बंदी लागू झाल्याने, तो आता भारत दौरा खेळू शकणार नाही.
शाकिबवर बंदी लागू झाल्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने, भारत दौऱ्यासाठी टी-२० संघाचे कर्णधारपद महमूदुल्लाहकडे तर कसोटी संघाची धुरा मोमिनुल हककडे सोपवली आहे. बांगलादेशचा संघ बुधवारी भारतामध्ये पोहोचणार आहे. दोन्ही उभय संघात रविवारी ३ नोव्हेंबरला दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात पहिला टी-२० सामना रंगणार आहे.
शाकिब अल हसनपूर्वी अनुभवी फलंदाज तमीम इक्बालने या दौऱ्यातून माघार घेतली. त्यानंतर सैफुद्दीनही दुखापतीमुळे भारत दौऱ्यावर येणार नाही. संघातील तीन प्रमुख खेळाडू या दौऱ्यात नसल्याने, भारतीय संघाचे पारडे जड झाले आहे. दरम्यान, बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यात ३ सामन्यांची टी-२० मालिका आणि २ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
हेही वाचा ः पहिला दिवस-रात्र कसोटी सामना : तिकिटाचे दर पाहून तुम्हीही म्हणाल इतकं स्वस्त कसं
हेही वाचा ः टीम इंडियाची 'गुलाबी' सुरूवात, २२ नोव्हेंबरपासून कोलकात्यात पहिला 'डे-नाईट' कसोटी सामना