मुंबई वि. तमिळनाडू - तिसऱ्या दिवसअखेर तमिळनाडूच्या ७ बाद २४९ धावा
कर्णधार आदित्य तरेच्या १५४ आणि शम्स मुलाणीच्या ८७ धावांच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात सर्वबाद ४८८ धावा केल्या. त्यानंतर कर्नाटकने आपल्या डावाला सुरुवात केली. सलामीवीर अभिनव मुकुंद (५८) आणि सुर्यप्रकाश (४१) यांनी तामिळनाडूला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर आलेल्या कौशिक गांधीने ६० धावा पटकावल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा अनुभवी फिरकीपटू रविचंद्र अश्विन ३२ आणि साई किशोर १७ धावांवर नाबाद होते. मुंबईकडून मुलाणी, देशपांडे, डायस यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या आहेत. मुंबईकडे अद्याप २३९ धावांची आघाडी आहे.
संक्षिप्त धावफलक -
- मुंबई (पहिला डाव) - ४८८/१० (आदित्य तरे १५४ धावा, शम्स मुलाणी ८७ धावा, शशांक अतार्डे ५८ धावा. साई किशोर ४ बळी, र. अश्विन ३ बळी)
- तामिळनाडू (पहिला डाव)* - २४९/७ (अभिनव मुकुंद ५८ धावा, सुर्यप्रकाश ४१ धावा. रविचंद्र अश्विन आणि साई किशोर खेळत आहेत.)
महाराष्ट्र वि. झारखंड - फॉलोऑननंतर झारखंडची सावध सुरुवात
१७० धावांवर पहिला डाव गडगडल्यानंतर झारखंडने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर १ बाद ४७ धावा केल्या आहेत. झारखंडचा संघ फॉलोऑनच्या पेचात सापडला असून २१७ धावांनी तो पिछाडीवर आहे. मुंबईच्या सत्यजीत बच्छावने पाच बळी घेत झारखंडला हादरा दिला. झारखंडकडून सौरभ तिवारीने ६२ आणि विराट सिंगने ४३ धावा केल्या. तत्पूर्वी विशांत मोरेच्या १२० आणि अझीम काझीच्या १४० धावांच्या जोरावर महाराष्ट्राने पहिल्या डावात ४३४ धावांचा डोंगर उभारला आहे.
संक्षिप्त धावफलक -
- महाराष्ट्र (पहिला डाव) - ४३४/१० (विशांत मोरे १२० धावा, अझीम काझी १४० धावा. उत्कर्ष सिंग १३०/५, राहुल शुक्ला ६३/३)
- झारखंड (पहिला डाव) - १७०/१० (सौरभ तिवारी ६२ धावा, विराट सिंग ४३ धावा. सत्यजीत बच्छाव ५५/५)
- झारखंड (दुसरा डाव)* - ४७/१ (नझीम सिद्दीकी २३ आणि उत्कर्ष सिंग १२ धावांवर खेळत आहेत. सत्यजीत बच्छाव १८/१)