ऑकलंड - न्यूझीलंडचा माजी यष्टीरक्षक फलंदाज ल्यूक राँचीची आगामी हंगामासाठी न्यूझीलंडच्या फलंदाजीच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जुलैमध्ये आपल्या पदाचा राजीनामा दोणाऱ्या पीटर फुल्टनच्या जागी त्याला फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. राँचीने ऑस्ट्रेलियाच्या संघासाठीही क्रिकेट खेळले आहे.
![Luke ronchi become new zealands batting coach](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/917221-luke-ronchi_0411newsroom_1604482645_588.jpg)
२०१७मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून राँची क्रिकेट वेलिंग्टनच्या विकास कार्यक्रमात सहभागी झाला. या व्यतिरिक्त तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये इस्लामाबाद युनायटेडचा खेळाडू आणि प्रशिक्षकही राहिला आहे. राँची पुढील दोन आठवड्यांमध्ये पुरुष संघासह आपले काम सुरू करणार आहे.
कारकीर्द -
राँचीने आपल्या कारकीर्दीत एकूण ४ कसोटी सामने, ८५ एकदिवसीय सामने आणि ३३ टी-२० सामने खेळले आहेत. राँची न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड आणि गोलंदाजी प्रशिक्षक शेन जर्गेन्सेन यांच्याबरोबर काम करेल. राँची गेली दोन वर्षे न्यूझीलंडच्या संघात काम करत होता. २०१९ विश्वचषकात तो न्यूझीलंडच्या संघासमवेत होता. ३९ वर्षीय राँची म्हणाला, "मी खूप आनंदी आहे. संघात सामील झाल्याने मला खूप आनंद झाला आहे."
तो म्हणाला, "मला संघाच्या फलंदाजांसोबत सतत काम करण्याची उत्तम संधी मिळत आहे. ही माझ्यावर एक मोठी जबाबदारी आहे. गॅरी आणि इतर सर्व प्रशिक्षकांसह आम्हाला आगामी काळात न्यूझीलंडमधी एक उत्तम रणनीती विकसित करायची आहे."