बंगळुरू - भारताचा आघाडीचा फलंदाज लोकेश राहुलने सोमवारी फलंदाजीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तो फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. राहुलच्या या व्हिडिओवरून त्याने आयपीएलची तयारी सुरू केली असल्याचे दिसते.
-
music to my ears 🏏 @lionsdenkxip pic.twitter.com/m8xim6pchV
— K L Rahul (@klrahul11) August 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">music to my ears 🏏 @lionsdenkxip pic.twitter.com/m8xim6pchV
— K L Rahul (@klrahul11) August 10, 2020music to my ears 🏏 @lionsdenkxip pic.twitter.com/m8xim6pchV
— K L Rahul (@klrahul11) August 10, 2020
१९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होणार्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात राहुल किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्व करणार आहेत. या व्हिडिओमध्ये राहुलने किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला टॅगही केले आहे. "माझ्या कानासाठी संगीत", असे त्याने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्व करणारा राहुल हा भारताचा पाचवा आणि जगातील १२ वा खेळाडू ठरेल. दुबई, अबू धाबी आणि शारजाह या तीन शहरांमध्ये बीसीसीआय आयपीएलच्या यंदाच्या हंगामाचे आयोजन करेल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल फ्रेंचायझींना स्पष्ट केले आहे, की कोणताही संघ 20 ऑगस्टपूर्वी संयुक्त अरब अमिरातीसाठी (युएई) रवाना होऊ शकत नाही. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सचा संघ अबूधाबीला 10 किंवा 12 ऑगस्टला रवाना होणार असल्याची चर्चा यापूर्वी रंगली होती.