लंडन - दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज कायले अॅबोटने एका कसोटी सामन्यात १७ गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे. अॅबोटने बुधवारी इंग्लीश कौंटी क्रिकेटमध्ये हॅम्पशायर क्लबकडून खेळताना ८६ धावांत १७ गडी टिपले. दरम्यान, १९५६ साली जीम लेकर यांच्यानंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. लेकर यांनी ६३ वर्षांपूर्वी मँचेस्टर ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुध्द ९० धावांत १९ गडी बाद केले होते.
हेही वाचा - IND VS SA : हवेत सूर मारुन कर्णधार कोहलीने घेतला 'विराट' झेल, पाहा व्हिडिओ
इंग्लिंश कौटी क्रिकेटमध्ये हॅम्पशायर आणि सोररसेट या संघातील सामन्यात हा पराक्रम घडला. अॅबोटने पहिल्या डावात ४० धावांत ९, तर दुसऱ्या डावात ४६ धावांत ८ गडी बाद केले. अॅबोटच्या या भन्नाट कामगिरीमुळे हॅम्पशायर संघाने हा सामना १३६ धावांनी जिंकला. या शतकात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात १७ बळी घेण्याचा हा दुसरा प्रसंग आहे. यापूर्वी २००४ मध्ये कॅनडाच्या जॉन डेव्हीसन याने अमेरिकेविरुद्ध १७ गडी बाद केले होते.
हेही वाचा - कर्णधार कोहलीने केले तीन 'विराट' विश्वविक्रम
प्रथम श्रेणीमध्ये एका कसोटीत सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम जीम लेकर यांच्या नावे आहे. त्यांनी १९५६ मध्ये १९ गडी बाद केले होते. तर या यादीत दुसऱ्या क्रमाकांवर एफ डब्लू लीली हायर आहेत. त्यांनी १८३७ मध्ये १८ गडी टिपले होते. तिसऱ्या स्थानवर एच ए आर्सराईट असून त्यांनी १८६१ मध्ये १८ गडी बाद करण्याचा कारनामा केला होता. या यादीत अॅबोट संयुक्तपणे चौथ्या क्रमांकावर आहे.