नवी दिल्ली - इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) प्रत्येक सामन्याची सुरूवात राष्ट्रगीताने व्हावी, अशी मागणी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे सहमालक नेस वाडिया यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) केली आहे. याबाबत त्यांनी प्रस्ताव मांडला असून बीसीसीआयकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे, त्यांनी व्यक्त केली.
नेस वाडिया म्हणाले, 'बीसीसीआयचा आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यावर पैसे खर्च न करण्याचा निर्णय योग्य आहे. मला नेहमीच उद्घाटनावर अनावश्यक खर्च असल्याचे, वाटत होते. पण, या निर्णयाबरोबरच बीसीसीआयने आयपीएलच्या सामन्यांना भारताच्या राष्ट्रगीताने सुरुवात करावी असे माझे मत आहे.'
दरम्यान, प्रो कबड्डी लीगमध्ये प्रत्येक सामन्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवण्यात येते. तसेच आयसीसीच्या बहुतांश स्पर्धामध्ये राष्ट्रगीताने सामन्यांना सुरुवात होते. परंतु अद्याप आयपीएलमध्ये याची सुरूवात करण्यात आलेली नाही. आता नेस वाडियाने केलेली मागणी यावर बीसीसीआय काय निर्णय घेते. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा - ये पठाण के हाथ हैं ठाकुर..! यूसुफ पठाणच्या शानदार झेलवर राशिद खानची मजेशीर कमेंट
हेही वाचा - डोपिंग प्रकरणात अडकलेल्या पृथ्वी शॉला वाढदिवसादिवशी 'गुड न्यूज'