ETV Bharat / sports

KXIP vs KKR - तेल ही गेलं तूप ही गेलं..! झेल सोडला, चौकार गेला अन् स्वतःही झाला दुखापतग्रस्त, पाहा व्हिडीओ

author img

By

Published : Oct 10, 2020, 7:13 PM IST

पंजाबविरुद्धच्या सामन्यात केकेआरचा खेळाडू आंद्रे रसेलच्या हातून केएल राहुलचा सोपा झेल सुटला. त्यानंतर चौकारही त्याला अडवता आला नाही आणि या प्रयत्नात त्याने स्वतःला दुखापतग्रस्त करून घेतले.

KXIP vs KKR : Russell drops catch, injures knee
KXIP vs KKR - तेल ही गेलं तूप गेल..! झेल सोडला, चौकार गेला अन् स्वतःही झाला दुखापतग्रस्त, पाहा व्हिडीओ

अबुधाबी - आयपीएल २०२० मध्ये कोलकाता नाइट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात अबुधाबी येथे सामना खेळला जात आहे. या सामन्यात केकेआरचा खेळाडू आंद्रे रसेलच्या हातून केएल राहुलचा सोपा झेल सुटला. त्यानंतर चौकारही त्याला अडवता आला नाही आणि या प्रयत्नात त्याने स्वतःला दुखापतग्रस्त करून घेतले.

केकेआरच्या १६४ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का बसला असता. परंतू घडले वेगळेच. प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर केएल राहुलचा झेल टिपण्याचा प्रयत्न करताना आंद्रे रसेलच्या हातून चेंडू सुटला आणि राहुलला जीवदान मिळाले. याशिवाय हा चेंडू अडवताना रसेलला दुखापत झाली. पण, तो चेंडू रसेल अडवू शकला नाही. राहुलला त्या चेंडूवर जीवदानासह चौकार मिळाला. दुसरीकडे झेल सुटला, चौकार गेला आणि रसेल दुखापतग्रस्त झाला. दरम्यान, तो गोलंदाजीसाठी येईल की नाही, याबाबतही शंका आहे. लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ

WATCH - Russell drops catch, injures knee

Failed to take a catch and hurt himself while saving a boundary. We hope Russell is fine.https://t.co/95hDIEDzXt #Dream11IPL

— IndianPremierLeague (@IPL) October 10, 2020

दरम्यान, कोलकाताने कर्णधार दिनेश कार्तिक आणि शुबमन गिल यांनी चौथ्या गड्यासाठी केलेल्या दमदार भागिदारीच्या जोरावर केकेआरने पंजाबसमोर विजयासाठी १६५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पंजाबच्या गोलंदाजांनी पहिल्या १० षटकात टिच्चून मारा केल्याने केकेआरच्या धावांवर लगाम लागला होता. मात्र त्यानंतर शुबमन गिल आणि दिनेश कार्तिक यांनी फटकेबाजी करत धावसंख्या दीडशेपार नेली. दोघांनी अर्धशतके झळकावत केकेआरला १६४ धावांची मजल मारून दिली. आंद्रे रसेलला आयपीएल २०२० मध्ये सहा सामन्यांत पाच विकेट्स आणि ५५ धावा करता आल्या आहेत.

हेही वाचा - KXIP VS KKR : एकाच दिशेला धावले दोन्ही फलंदाज, अन्...

हेही वाचा - 'केदार म्हणजे हुंड्यात आलेल्या मेव्हण्यासारखा…', सेहवागने चेन्नईच्या फलंदाजांची घेतली शाळा

अबुधाबी - आयपीएल २०२० मध्ये कोलकाता नाइट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात अबुधाबी येथे सामना खेळला जात आहे. या सामन्यात केकेआरचा खेळाडू आंद्रे रसेलच्या हातून केएल राहुलचा सोपा झेल सुटला. त्यानंतर चौकारही त्याला अडवता आला नाही आणि या प्रयत्नात त्याने स्वतःला दुखापतग्रस्त करून घेतले.

केकेआरच्या १६४ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का बसला असता. परंतू घडले वेगळेच. प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर केएल राहुलचा झेल टिपण्याचा प्रयत्न करताना आंद्रे रसेलच्या हातून चेंडू सुटला आणि राहुलला जीवदान मिळाले. याशिवाय हा चेंडू अडवताना रसेलला दुखापत झाली. पण, तो चेंडू रसेल अडवू शकला नाही. राहुलला त्या चेंडूवर जीवदानासह चौकार मिळाला. दुसरीकडे झेल सुटला, चौकार गेला आणि रसेल दुखापतग्रस्त झाला. दरम्यान, तो गोलंदाजीसाठी येईल की नाही, याबाबतही शंका आहे. लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ

दरम्यान, कोलकाताने कर्णधार दिनेश कार्तिक आणि शुबमन गिल यांनी चौथ्या गड्यासाठी केलेल्या दमदार भागिदारीच्या जोरावर केकेआरने पंजाबसमोर विजयासाठी १६५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पंजाबच्या गोलंदाजांनी पहिल्या १० षटकात टिच्चून मारा केल्याने केकेआरच्या धावांवर लगाम लागला होता. मात्र त्यानंतर शुबमन गिल आणि दिनेश कार्तिक यांनी फटकेबाजी करत धावसंख्या दीडशेपार नेली. दोघांनी अर्धशतके झळकावत केकेआरला १६४ धावांची मजल मारून दिली. आंद्रे रसेलला आयपीएल २०२० मध्ये सहा सामन्यांत पाच विकेट्स आणि ५५ धावा करता आल्या आहेत.

हेही वाचा - KXIP VS KKR : एकाच दिशेला धावले दोन्ही फलंदाज, अन्...

हेही वाचा - 'केदार म्हणजे हुंड्यात आलेल्या मेव्हण्यासारखा…', सेहवागने चेन्नईच्या फलंदाजांची घेतली शाळा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.