मुंबई - श्रीलंकेचे माजी कर्णधार आणि राजस्थान रॉयल्स संघाचे क्रिकेट संचालक कुमार संगकारा यांनी, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याची अनुपस्थिती हा संघासाठी एक मोठा धक्का असल्याची कबुली दिली आहे. तसेच त्यांनी याचा फायदा युवा भारतीय गोलंदाज नक्कीच घेतील, अशी आशा देखील व्यक्त केली आहे.
हाताच्या दुखापतीनंतर जोफ्रा आर्चर यांच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तो सध्या आराम करत आहे. जोफ्रा आयपीएलसाठी केव्हा उपलब्ध होऊ शकतो याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
या विषयावरून संगकारा म्हणाले की, 'संजू सॅमसन आणि मी सहमत आहोत की जोफ्रा संघात नसणे आमच्यासाठी एक मोठा धक्का आहे. तो संघाचा महत्वाचा भाग आहे. मात्र हे लक्षात घेऊन आता त्यानुसार योजना बनवत आहोत.'
अनुभवाची कमतरता हे कदाचित आमच्यासाठी जमेची बाजू देखील ठरू शकते. आमच्याकडे कुलदीप यादव आणि चेतन सकारीया यांच्या रुपाने अतिरिक्त गोलंदाज आहेत. दबाव हा नेहमीच असतो. मग तो संजू असो वा राहुल वास्तविकता स्वीकारावी लागते. खेळाडूंकडून नेहमीच अपेक्षा केली जाते आणि तुम्हाला दबावाचा सामना करावा लागतो, असेही संगकारा म्हणाले.
दरम्यान, मागील काही वर्षांपासून राजस्थान रॉयल्ससाठी गोलंदाजी ही कमकुवत राहिली आहे. त्यांचा सर्वात अनुभवी गोलंदाज जयदेव उनाडकट हा चांगला खेळ करु शकलेला नाही.
हेही वाचा - जेव्हा द्रविड धोनीवर रागावतो, सेहवागने सांगितला पाकिस्तान दौऱ्यातील किस्सा
हेही वाचा - T-२० क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विजय मिळवणारे टॉप-५ संघ; पाकिस्तानने रचला इतिहास