रांची - दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. मात्र, या कसोटीपूर्वी भारताला मोठा धक्का लागला आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव या कसोटीत खेळू शकणार नाही.
हेही वाचा - ..तर, शास्त्री मुर्खांच्या राज्यात जगत आहेत, गांगुलीचे वक्तव्य
आफ्रिकेबरोबरच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी कुलदीप यादवच्या बदली डावखुरा फिरकीपटू शाहबाज नदीमचा संघात समावेश आहे. शुक्रवारी कुलदीप यादवच्या डाव्या खांद्यावर वेदना झाल्याने ३० वर्षीय झारखंडच्या नदीमचा संघात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाहबाज नदीमने ११० प्रथम श्रेणी सामन्यांत ४२४ बळी घेतले आहेत.
आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत भारताने २-० ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसऱ्या आणि अंतिम सामन्यातही आफ्रिकेचा सुपडा साफ करण्याचा भारतीय संघाचा मानस असणार आहे.