कोलकाता - भारतातील सर्वात मोठी लीग आयपीएलला शनिवारी २३ मार्चपासून सुरूवात होत आहे. या लीगमधील केकेआरच्या संघाला दुखापतीचे ग्रहण लागले आहे. आयपीएलचा किताब दोनदा जिंकणाऱ्या केकेआरचा वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्टजे खांद्याच्या दुखापतमीमुळे लीगमधून बाहेर पडला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज नॉर्टजेऐवजी केकेआरच्या संघात कुणाला संधी मिळाली याची माहिती अद्याप देण्यात आली नाही. यापूर्वीच केकेआरचे २ खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत. त्यात आता नॉर्टजेची भर पडली आहे. कमलेश नागरकोटी आणि शिवम मावी हे दुखापतीमुळे आयपीएलमध्ये दिसणार नाहीत. त्यांच्या जागी संदीप वॉरियर आणि फिरकी गोलंदाज के.सी. करियप्पा यांची वर्णी लागली आहे.
आयपीएल २०१९ च्या लिलावात केकेआरने एनरिच नॉर्टजेला २० लाख रुपयात विकत घेतले आहे. तो दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून ४ सामने खेळला आहे.