ETV Bharat / sports

एकाच सामन्यात लोकेश राहुलने रचले मोठे विक्रम, वाचा सविस्तर... - लोकेश राहुल रेकॉर्ड न्यूज

आयपीएलच्या तेराव्या सत्रात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाबचा कर्णधार राहुलने ६९ चेंडूत १३२ धावांची आतषबाजी खेळी केली. या खेळीसह त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

kl rahul scripts many records in ipl 2020
एकाच सामन्यात लोकेश राहुलने रचले मोठे विक्रम, वाचा सविस्तर
author img

By

Published : Sep 25, 2020, 4:27 PM IST

हैदराबाद - किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध झालेल्या सामन्यात ६९ चेंडूत १३२ धावांची आतषबाजी खेळी केली. त्याच्या खेळीत १४ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. पंजाबने बंगळुरूसमोर प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २०६ धावा केल्या. तर, विराटच्या नेतृत्वातील बंगळुरूचा संघ १७ षटकात १०९ धावांतच गारद झाला. राहुलने या सामन्यात अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

राहुलची ही खेळीही आयपीएलच्या इतिहासातील कर्णधाराने झळकावलेली सर्वोच्च खेळी ठरली. २०१७च्या हंगामात डेव्हिड वॉर्नरने हैदराबादचे कर्णधारपद भूषवताना ५९ चेंडूत १२६ धावांची खेळी केली होती. कोलकाताविरोधात त्याने हा विक्रम नोंदवला होता. हा विक्रम राहुलने मोडित काढला.

लोकेश राहुलने या सामन्यात फलंदाजी करताना आयपीएल कारकिर्दीत २००० धावांचा टप्पा गाठला. असा विक्रम करणारा तो ३२वा फलंदाज ठरला. राहुलने ६९ सामने आणि ६० डावांत हा पराक्रम केला. सर्वात जलद २००० धावा करणारा भारतीय खेळाडू म्हणून लोकेश राहुलचे नाव घेतले जाणार आहे. त्याने क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरला या विक्रमात मागे टाकले आहे.

राहुलने या सामन्यात बंगळुरूच्या डेल स्टेन, उमेश यादव, नवदीप सैनी आणि शिवम दुबे या गोलंदाजांची पिसे काढत दुबई स्टेडियमच्या प्रत्येक कोपऱ्यात चेंडू पोहोचवला. आयपीएलमध्ये तो आता एक कर्णधार म्हणून आणि कर्णधार नसतानाही शतक ठोकलेला तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी, वीरेंद्र सेहवाग आणि डेव्हिड वॉर्नरने हा पराक्रम केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.