लंडन - इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनने ट्विटरवर भारतीयांना एक खास संदेश दिला होता. कोरोनावर खबरदारी म्हणून असलेला हा हिंदी संदेश मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. आता या ट्विटची दखल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घेतली आहे.
हेही वाचा - वर्ल्डकप खेळलेल्या क्रिकेटपटूला कोरोनाची लागण!
भारतात कोरोनाचा धोका वाढलेला पाहून पीटरसननेही भारताला एक विशेष संदेश दिला. 'नमस्ते इंडिया. कोरोना व्हायरसचा पराभव करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आहोत. चला आपण सर्वांनी आपल्या सरकारच्या आदेशाचे पालन करू घरी राहू. ही वेळ दक्षता घेण्याची आहे. तुम्हा सर्वांना खूप प्रेम', असे पीटरसनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. त्यावर मोदींनी 'विस्फोटक फलंदाज आपल्याला काही सांगत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी आपणही एकत्र येऊया', अशी प्रतिक्रिया दिली.
मोदींच्या या प्रतिक्रियेला पीटरसनने हिंदीतूनच 'रिप्लाय' दिला. 'धन्यवाद मोदीजी, तुमचे नेतृत्वही फार विस्फोटक आहे', असे सांगत पीटरसनने मोदींचे कौतुक केले आहे.
-
Shukriya Modi ji , aapki leadership bhi kaafi bispotak hai 🙏🏻
— Kevin Pietersen🦏 (@KP24) March 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Shukriya Modi ji , aapki leadership bhi kaafi bispotak hai 🙏🏻
— Kevin Pietersen🦏 (@KP24) March 20, 2020Shukriya Modi ji , aapki leadership bhi kaafi bispotak hai 🙏🏻
— Kevin Pietersen🦏 (@KP24) March 20, 2020
चीनच्या वुहान शहरातून जगभरात वाऱ्यासारखा पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे १० हजाराहून अधिक लोकांचा प्राण गेला आहे. जगातील १५० हून अधिक देशात या विषाणूचा फैलाव झाला असून दीड लाखांहून अधिक लोकांना यांची बाधा झाली आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने उपाययोजना करत आहे.