चंदिगड - भारताचे माजी कर्णधार आणि महान गोलंदाज कपिल देव यांची हरयाणा स्पोर्ट्स विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून निवड करण्यात आली आहे. याची माहिती हरयाणा युवा व क्रीडा मंत्री अनिल वीज यांनी ट्विट करून दिली. हरयाणा स्पोर्ट्स विद्यापीठ हे देशातील तिसरे क्रीडा विद्यापीठ आहे.
कपिल देव यांना कुलगुरू म्हणून निवडीबाबत घोषणा केल्यानंतर वीज यांनी सांगितलं की, 'या विद्यापीठाला राष्ट्रपतींची अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे. मात्र, यासाठीचे सर्व पत्रव्यवहार करण्यात आले आहेत. या विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कपिल देव यांची त्यांच्यांशी बातचित करुन नियुक्ती करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.'
हेही वाचा - चुरशीचा सामना जिंकत टीम इंडियाने पटकावला 'आशिया चषक', मुंबईचा अथर्व ठरला हिरो
महत्वाची बाब म्हणजे, कपिल देव यांनी १९७५ मध्ये हरयाणाकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात त्यांनी पंजाबविरुद्धच्या ६ गडी बाद करत हरयाणा संघाला विजय मिळवून दिला होता.
हेही वाचा - नागार्जुनच्या उपस्थितीत चामुंडेश्वरी नाथ यांनी दिली सिंधूला बीएमडब्ल्यू भेट
कपिल देव यांना कुलगुरूपदी निवड करण्यात आलेल्या विद्यापीठामध्ये, क्रीडा हाच विषय पुर्णत: असणार आहे. असे खेळासाठी असलेले हे पहिलेच विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची निर्मिती राज्यातील विद्यार्थ्यांना क्रीडा विषयक करिअरच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी करण्यात आली आहे.