मुंबई - दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कंगिसो रबाडा सध्या दुखापतीने त्रस्त आहे. आयपीएलमध्ये तो दिल्लीच्या संघाकडून खेळत आहे. त्याच्या दुखापतीची चिंता जेवढी दिल्लीच्या संघाला, तेवढीच दक्षिण आफ्रिका संघालाही आहे. कारण विश्वचषक स्पर्धा तोंडावर आहे.
कमरेच्या दुखापतीने त्रस्त असलेला रबाडा बुधवारी चेन्नईविरुद्धच्या सामन्यात खेळला नाही. यामुळे दिल्लीचा ८० धावांनी पराभव झाला. या सीजनमधला हा पहिला सामना होता, या सामन्यात रबाडा खेळला नाही. डेथ ओव्हरमध्ये तो अचूक मारा करत फलंदाजांवर दबाव टाकतो.
विश्वचषकापूर्वी रबाडाची दुखापत बरी न झाल्यास याचा फटका दक्षिण आफ्रिका संघाला बसू सकतो. यापूर्वी डेल स्टेन दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. डेल स्टेन आणि कंगिसो रबाडा हे आफ्रिकेचे प्रमुख गोलंदाज आहेत. ते विश्वचषकापूर्वी अनफिट झाल्यास आफ्रिकेला मोठा धक्का बसू शकतो. आयपीएलमध्ये कंगिसो रबाडाने १२ सामन्यात २५ गडी बाद केले आहेत. सर्वाधिक २५ गडी बाद केल्याने सध्या पर्पल कॅप रबाडाकडे आहे.