मुंबई - दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज क्षेत्रक्षक आणि क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्सला बॉलिवूडच्या एका चित्रपटाची भूरळ पडली आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचा अभिनय असलेला 'गली बॉय' हा चित्रपट पाहून अंगावर शहारे आले असल्याची प्रतिक्रिया जॉन्टी ऱ्होड्सने दिली आहे.
हेही वाचा - स्मिथचा भारतात मोठा विक्रम, पहिल्यांदाच केली 'अशी' कामगिरी
या चित्रपटातील अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि जॉन्टी ऱ्होड्सची भेट झाली होती. त्यानंतर, जॉन्टी ऱ्होड्सने या चित्रपटाची गाणी ऐकली. 'गेल्या वर्षी मी सिद्धांत चतुर्वेदीला एका कार्यक्रमात भेटलो तेव्हापासून मी 'गली बॉय' ची गाणी ऐकत आलो आहे. काल रात्री मी अमिरातीहून भारतात आलो तेव्हा हा संपूर्ण चित्रपट पाहिला. उपशीर्षकांबद्दल धन्यवाद. हसलो, ओरडलो आणि माझे केसदेखील उभे राहिले', असे जॉन्टी ऱ्होड्सने म्हटले आहे.
-
Been listening to the #GullyBoy soundtrack ever since meeting @SiddhantChturvD last year at an event, finally got to watch the entire movie on my @emirates to India last night. Thanks to subtitles, I laughed; cried and had goosebumps @RanveerOfficial @aliaa08 @kalkikanmani
— Jonty Rhodes (@JontyRhodes8) January 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Been listening to the #GullyBoy soundtrack ever since meeting @SiddhantChturvD last year at an event, finally got to watch the entire movie on my @emirates to India last night. Thanks to subtitles, I laughed; cried and had goosebumps @RanveerOfficial @aliaa08 @kalkikanmani
— Jonty Rhodes (@JontyRhodes8) January 17, 2020Been listening to the #GullyBoy soundtrack ever since meeting @SiddhantChturvD last year at an event, finally got to watch the entire movie on my @emirates to India last night. Thanks to subtitles, I laughed; cried and had goosebumps @RanveerOfficial @aliaa08 @kalkikanmani
— Jonty Rhodes (@JontyRhodes8) January 17, 2020
रॅपर्स नावेद शेख ( नेजी ) आणि विवियन फर्नांडिस ( डिवाईन ) यांच्या जीवनावर आधारित असेला 'गली बॉय' हा चित्रपट झोया अख्तरने दिग्दर्शित केला होता. मात्र, काहीजणांनी या चित्रपटाची तुलना हॉलिवूडच्या 'स्ट्रेट आउटा कॉम्पटॉन' या चित्रपटाशी केली होती. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील एक तरुण आपल्या समस्या रॅपच्या माध्यमातून मांडतो, अशी याची कथा होती. या रॅपरची भूमिका रणवीर सिंगने साकारली होती.
२०१९ च्या फेब्रुवारीत प्रदर्शित झालेल्या 'गली बॉय'ने बॉक्स ऑफिसवरही कमाल केली होती. भारताच्या वतीने या चित्रपटाची ऑस्कर नामांकनासाठी निवड केली होती. मात्र 'गली बॉय' ऑस्करच्या शर्यतीत टिकू शकला नाही.