ETV Bharat / sports

'फॅब फोर'मध्ये रुट अव्वल, धावांबाबतीत कोहलीला टाकले मागे

कसोटी क्रिकेटमध्ये धावांबाबत भारतीय कर्णधार विराट कोहलीला  इंग्लंडचा कर्णधार जो रुटने मागे टाकले आहे

संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Feb 12, 2019, 4:46 PM IST

सेंट लुसिया - जो रुट, विराट कोहली, स्टिव स्मिथ आणि केन विलियम्सन हे सध्याच्या घडीला कसोटी क्रिकेटमधील 'फॅब फोर' म्हणून ओळखले जातात. या चारही खेळाडूंनी आपल्या शानदार खेळीने क्रिकेट विश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली असून या खेळाडूंमध्ये सतत धावांची स्पर्धा पहायला मिळते.

विंडीजविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत सामन्यातील दुसऱ्या डावात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने शानदार शतक साजरे केले. या शतकासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये धावांबाबत भारतीय कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे. कसोटीत सध्या विराटच्या नावावर ७७ सामन्यांमध्ये ६ हजार ६१३ धावा, तर रुटच्या नावावर ८० सामन्यांमध्ये ६ हजार ६७४ धावा जमा झाल्या असून तो 'फॅब फोर'मध्ये अव्वल स्थानी आहे.

या यादीत निलंबनाची शिक्षा भोगत असलेला माजी कांगारू कर्णधार स्टिव स्मिथ ६ हजार १९९ धावांसह तिसऱ्या स्थानी असून न्यूझीलंड कर्णधार केन विलियम्सन ५ हजार ८६५ करून चौथ्या स्थानी आहे.

Intro:Body:

joe root hit ton breaks Virat Kohli's most runs record in test 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.